शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

या राज्यात अजूनही 85 टक्के गावांतील लोक बसतात उघड्यावर शौचास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 15:44 IST

आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव: आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. गोव्यातील 85 टक्के गाव अजूनही उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त झालेले नाहीत. तर 84 टक्के गावात शुश्रृषालयाची सोय नसल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर केवळ 12 टक्के गावातच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.अंत्योदय योजनेखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील 1,10,765 गावांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात गोव्यातील 384 गावांचा समावेश होता. वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक याबाबतीत गोव्यातील गावांची स्थिती उत्तम असली तरी शेतकी सुविधांच्या बाबतीत गोव्यातील गाव बरेच मागास असल्याचेही उघडकीस आले आहे. गोव्यातील केवळ 9 गावातच माती परीक्षण केंद्रे उपलब्ध असून, 15 गावांमध्ये बियाणांची केंद्रे तर 38 गावामध्ये खतांची दुकाने उपलब्ध असल्याचे या सर्वेक्षणातून माहिती पुढे आली आहे.या योजनेखाली गोव्यातील 186 ग्रामपंचायतींच्या खाली येणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या गावात असलेल्या सुविधेप्रमाणे त्यांना गुण देण्यात आले होते. गोव्यातील एकाही गावाला 80 पेक्षा जास्त गुण मिळालेले नसून 70 ते 80 या गुण मर्यादेत सहा, 60 ते 70 या गुण मर्यादित 52, तर 50 ते 60 या गुण मर्यादेत 79 गावांचा समावेश आहे. गोव्यात सर्वाधिक गुण कांदोळी (79) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाला 22 वे स्थान मिळाले आहे. तर सर्वात कमी गुण सत्तरी भागातील केरी (29) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाचा क्रमांक 72 वा आहे.गोव्यातील उत्कृष्ट पाच पंचायतींमध्ये कांदोळी नंतर फोंड्यातील कवळे, सासष्टीतील राय तसेच फोंड्यातील तिवरे-वरगाव व बांदोडा यांचा समावेश होत असून राष्ट्रीय क्रमवारीत या पंचायतींचे स्थान अनुक्रमे 23, 26, 27 व 30 असे आहे. तर निकृष्ट पाच पंचायतींमध्ये सत्तरीतील केरी व सावर्डे, सांगेतील काले, बार्देसातील नादोरा तर केपेतील कावरे या पंचायतींचा समावेश आहे. या पंचायतींचा राष्ट्रीय स्तरावरील क्रमांक अनुक्रमे 72, 70, 69, 67 व 66 असे आहेत. राष्ट्रीय पातळीवरील चित्र पहाता आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू या तीन राज्यांनी आघाडी घेतली असून तळांच्या राज्यांमध्ये छत्तीसगड व बिहार यांचा समावेश होत आहे. ग्रामपातळीवरील साधनसुविधा आणि मानवविकास व आर्थिक विकास या गुणनिकषावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते.