लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येथील क्रूझ टर्मिनलजवळ आयोजित आध्यात्मिक महोत्सवात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी सोमवारी सहभाग घेतला. आध्यात्मिक महोत्सवाने गोव्याला दक्षिण काशी म्हणून पुढे आणण्यासाठी, तसेच भारतातील एक आध्यात्मिक केंद्र म्हणून नावारूपास आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, महंत बाबा हटयोगी स्वामी, डॉ. भूपेंद्र गिरी, शंकर तिलकानंद स्वामी, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार नीलेश काब्राल, आमदार दाजी साळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आदी याप्रसंगी उपस्थित होते. आरती, तसेच अन्य आध्यात्मिक उपक्रम हाती घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तपोभूमी दत्त पद्मनाभ पीठाचे अभिनंदन केले. सरकार राज्यातील अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.