शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेला गती द्या! मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

By किशोर कुबल | Updated: November 23, 2023 18:15 IST

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,' पहिल्या दोन टप्प्यात ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव सरकारने केला आहे.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन खाण, वन आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना खाण ब्लॉक्सच्या पुढील फेरीच्या लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. चिरे, खडी, रेती आदी गौण खनिजाच्या बाबतीतही ईसी तसेच लीज नूतनीकरण प्रक्रियेला चालना देण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,' पहिल्या दोन टप्प्यात ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव सरकारने केला आहे. राज्यातील एकूण ८६ खाणपट्ट्यांचा लिलांव करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सावंत लोहखनिजाच्या खाणींच्या बाबतीत समस्यांचे पुनरावलोकन केले. खाण खाते तसेच वन, पर्यावरण विभागाच्या अधिका-यांना खाण ब्लॉक्सच्या लिलावाची पुढील फेरी आणि इतर प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गौण खनिजाच्या बाबतीत पर्यावरणीय परवाने (ईसी), लीज नूतनीकरण, खाणींच्या  प्लॅनला मान्यता, रॉयल्टी किंवा ट्रान्झिट पास जारी करणे, दंड इत्यादी विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न वेळेत सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.'

दरम्यान, सर्व ८६ खाण लीजांचा तीन महिन्यांच्या आत लिलांव केला जाईल, असे सरकारने गेल्या जानेवारीत जाहीर केले होते. परंतु आतापर्यंत केवळ नऊ खाण ब्लॉकचाच लिलांव झाला आहे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू आहे. शिवाय लिलांवात गेलेल्या खाणींसाठी ईसी तसेच अन्य परवाने आवश्यक बनले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरपासून खाण व्यवसाय सुरू होईल असे पावसाळ्यापूर्वी जाहीर केले होते परंतु सध्याची गती पाहता ते एवढ्या लवकर शक्य नसल्याचे चिन्हे दिसतात.

रेतीमुळे बांधकाम अडली,बैठकीत गंभीर्याने  चर्चादुसरीकडे रेती व्यवसाय अजून सुरु होऊ शकलेला नाही त्यामुळे बांधकामे अडली आहेत. पावसाळा संपला असून आता तरी रेती उपसा सुरु होणे अपेक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्देश दिले. तसेच चिरेखाणी, खडी याबाबतीतही निर्देश देण्यात आले. दरम्यान, बेकायदा वाळू उपसा चालूच आहे. गेल्या तीन वर्षांत ३००० क्युबिक मीटर वाळू जप्त करण्यात आली. अवैध वाळू उपशा बद्दल हायकोर्टानेही खडसावले आहे. काही ठिकाणी धाडी घालून होड्या आणि वाळूचे ट्रक जप्त करण्यात आले. परंतु ही कारवाई म्हणजे डोळ्यांना पाने पुसण्यासारखीच असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत