शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांना साधनसुविधा निर्माणासाठी विशेष अनुदान, अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:22 IST

सरकारकडून नवी विशेष अनुदान योजना अधिसूचित

पणजी : राज्यातील तीन नगरपालिकांच्या क्षेत्रात साधनसुविधांचे निर्माण करण्यासाठी पालिका प्रशासन खात्याकडून विशेष अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी सरकारने नवी विशेष अनुदान योजना अधिसूचित केली. या अंतर्गत अर्थसाह्य देण्याची पद्धत निश्चित केली गेली आहे.म्हापसा, कुडचडे आणि डिचोली या तीन पालिकांना विशेष अनुदान देण्याचे सरकारने ठरवले आहे. जे प्रकल्प विशेष साधनसुविधा गटात येतील व जे प्रकल्प एका प्रभागापेक्षा जास्त प्रभागातील लोकांना लाभदायी ठरतील, अशा प्रकल्पांसाठीच हे अनुदान असेल. तसेच जे प्रकल्प पालिकेला महसुल प्राप्त करून देऊ शकतील असेही प्रकल्प विशेष अनुदानासाठी पात्र ठरतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात पालिकांनी अशा प्रकल्पांचे काम सुरू करावे असे सरकारला अपेक्षित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. तिन्ही पालिकांनी प्रकल्पांसाठी प्रस्ताव पालिका प्रशासन खात्याकडे सादर करावेत. त्या प्रस्तावासोबत पालिकेचा ठराव असावा तसेच जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि तांत्रिक मंजुरी असावी. अंदाजित खर्चही नमूद केलेला असावा असे अपेक्षित आहे. नगर विकास खात्याच्या गंगाजळीतून हप्त्याहप्त्याने प्रकल्पासाठी निधी दिला जाईल. जो निधी वीनावापर उरेल, तो सरकारला परत करावा लागेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. प्रकल्पांसाठी अनुदान मंजुर करण्यामध्ये जर योजनेतील एखादी तरतुद अडचणीची ठरत असेल तर ती तरतुद शिथिल करण्याचा अधिकार सरकारने स्वत:जवळ राखून ठेवला आहे. दरम्यान, राज्यात एकूण चौदा पालिका आहेत. अनेक पालिका आपल्याला सरकारकडून दरवर्षी विविध प्रकारचे अनुदान नियमितपणो मिळत नाही अशा तक्रारी करत आहेत. म्हापसा पालिकेसह अनेक पालिकांचा निधी यापूर्वी अडला होता. 

टॅग्स :goaगोवाMuncipal Corporationनगर पालिका