शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांचे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:12 IST

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवित असून, पोलिसांनाही अशा नागरिकांची विशेषत: घरात एकाकी राहण्याची तयार करण्यास सांगितले आहे.

मडगाव - ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवित असून, पोलिसांनाही अशा नागरिकांची विशेषतता घरात एकाकी राहण्याची तयार करण्यास सांगितले आहे. राज्यातील दक्षिण गोवा पोलिसांनी या उपक्रमाला सुरुवात करताना ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार केली जात असून, आतार्पयत 1799 नागरिकांचे अर्ज भरण्यात आले आहे. बीट पोलिसांना अशा ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून, दुचाकीवरुन गस्त घालणारे बीट पोलीस अशा नागरिकांची विचारपूस करुन, त्यांच्या तब्येतीविषयी तसेच त्यांच्या सुरक्षतेविषयी माहिती जाणून घेत आहे.दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी आपण जिल्हयातील सर्व पोलीस निरीक्षकांना ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेविषयी काळजी घेण्यास सांगितल्या स्पष्ट केले. मडगाव पोलीस ठाण्याच्या कक्षेत एकूण 179 ज्येष्ठ नागरिकांची फॉर्मस भरण्यात आली आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्यात  162, कोलवा  पोलीस सर्वात जास्त म्हणजे 333, कुंकळळी 225, फातोर्डा 133,काणकोण 124,केपे 121,कुडचडे 100 व सांगे पोलीस ठाण्यात 84 अर्ज भरण्यात आले आहे.वास्को पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांवी 97 अर्ज भरले आहे, वेर्णा 120,मुरगाव 25, फोंडा 69 तर कुळे पोलीस ठाण्यात हा आकडा 84 इतका आहे, पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाउन त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतात, शाररिक सुरक्षा तसेच घरगुती प्रश्नावरही या ज्येष्ठ नागरिकांना पोलीस मदत करीत असतात अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत आमची टीम ज्येष्ठ नागरिकांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देणो हे पोलिसांचे कर्तव्य असून, आम्ही आमची डयुटी करीत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा