शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी बोळवणच, आमदार चर्चेच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 21:49 IST

राज्यातील खनिज खाण बंदीच्या प्रश्नावर तोडगा कसा काढावा याविषयी गोवा सरकार अजून साडेचार महिन्यांनंतर देखील गोंधळातच आहे.

पणजी : राज्यातील खनिज खाण बंदीच्या प्रश्नावर तोडगा कसा काढावा याविषयी गोवा सरकार अजून साडेचार महिन्यांनंतर देखील गोंधळातच आहे. सरकारला अजून दिशा सापडलेली नाही. येत्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकार खाणप्रश्नी भूमिका ठरवणार आहे असे आश्वासन तूर्त काही आमदारांना दिले गेले आहे. खाणग्रस्त भागातील काही भाजप आमदार अजून या विषयावर मुख्यमंत्री चर्चेसाठी आपल्याला कधी बोलवतील अशा प्रतीक्षेत आहेत.

राज्यात खनिज लिज रद्दचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी दिला व दि. 15 पासून खनिज खाणी बंद झाल्या. चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी, खनिज खाणप्रश्नी लोकांना नेमके कोणते आश्वासन द्यावे ते सरकारला अजुनही कळेनासे झाले आहे. काही आमदारांनी मध्यंतरी खाण अवलंबितांसमोर जाऊन खनिज खाणी ऑक्टोबर्पयत सुरू होतील, असे मोघमपणो सांगितले पण त्या कशा सुरू होतील ते कुणीच सांगत नाही. आमदार व मंत्र्यांनाही ते ठाऊक नाही. खाणप्रश्नी अजून भूमिका ठरत नसेल तर मग गेले तीन महिने तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने केले तरी काय असा प्रश्न लोकांना पडला आहे. 

 सावर्डेचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांना मुख्यमंत्री मनोहर यांनी गुरुवारी दुपारी भेटीसाठी वेळ दिली होती. मुख्यमंत्र्यांनी खाणपट्टय़ातील सर्वच आमदारांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे दोन दिवसांपूर्वी पाऊसकर यांनी पत्रकारांना सांगितले. प्रत्यक्षात केवळ पाऊसकर यांनाच बोलावले होते व ते केवळ खाणींच्याच नव्हे तर सावर्डेतील अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यासाठी बोलावले होते. पाऊसकर यांनी खाणींचा विषय गुरुवारी मांडला तेव्हा खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात असे आपल्यालाही वाटते पण आपण पंतप्रधानांना येत्या आठवडय़ात भेटेन व मग खाणींविषयी सरकारची भूमिका जाहीर करीन, असे र्पीकर यांनी पाऊसकर यांना सांगितले. खनिज खाणींबाबत अध्यादेश जारी केला जाईल की न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर केली जाईल की थेट लिलाव सुरू केला जाईल हे कुणालाच ठाऊक नाही. खाण कंपन्यांनी मात्र कामगारांना कधीच घरी पाठवले आहे.मंत्र्यांनाही सल्ला (चौकट)गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तुम्ही खाणग्रस्त भागातील लोकांना अगोदरच विविध आश्वासने देत सुटू नका, आपण अगोदर खाण बंदीच्या या विषयाचा अभ्यास करून योग्य ते धोरण ठरवतो असे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत मंत्र्यांना सांगितले. आपण प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. खनिज खाणींचा लिलाव पुकारावा असा सल्ला यापूर्वी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी दिला आहे. सरकार अगोदर फेरविचार याचिका सादर करते असे म्हणत होते. मग विषय हस्तक्षेप याचिकेर्पयत आला. खाण अवलंबित मात्र अध्यादेश जारी करा व अगोदरच्याच लिजधारकांना खाणी द्या अशी मागणी करत आहेत. खाण कंपन्यांनी कामगारांना सेवेतून कमी केल्याचा मुद्दा मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यांनी लिजधारकांशी त्याविषयी चर्चा करण्याची ग्वाही दिली आहे. खाणग्रस्त भागातील प्रत्येक आमदाराशी मुख्यमंत्री स्वतंत्रपणो चर्चा करतील. येत्या आठवडय़ात मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतील व मग या विषयाबाबत स्पष्टता येईल. खाणी लवकर सुरू व्हाव्यात ही मुख्यमंत्र्यांचीही इच्छा आहे. केंद्राने अध्यादेशच जारी करावा असे आम्हाला तरी वाटते.- आमदार दिपक प्रभू पाऊसकर