शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता याचिकेसाठी सभापतींवर वेळेचे बंधन हवेच!; लोकायुक्तांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:51 IST

'लोकमत' कार्यालयास भेट.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देण्यासाठी सभापतींवर वेळेचे बंधन असायला हवे, असे मत लोकायुक्त तथा हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी व्यक्त केले. 'लोकमत'ला बुधवारी दिलेल्या सौजन्य भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते. 

महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या तसेच अजित पवार गटाच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर ठरावीक कालावधीत निवाडा देण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातही सभापती रमेश तवडकर यांच्याकडे आठ काँग्रेसच्या फुटीर आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका आहेत. 

न्यायालयाने सभापतींना अपात्रता याचिकांवर निवाडा देण्यासाठी वेळेचे बंधन घालणे योग्य आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, यावर माझे म्हणणे 'हो' असेच आहे. वेळेचे बंधन असायला हवे. लोकप्रभावाखाली न्यायदान करणे चुकीचे नव्हे. जनमताची कदर व्हायला हवी, न्यायालय न्याय देते असे म्हणण्यापेक्षा अन्याय निवारणाचे काम करते, असे म्हणणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले. लोकायुक्त म्हणाले की, 'न्यायाधीशाने वकिलांना खरे तर प्रश्न करून खटल्यातील न उलडगणारे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करावा.

सरकारी निर्णयांविरुद्ध अपिलांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल विचारले असता लोकायुक्त म्हणाले की, वरिष्ठ सरकारी अधिकारी जेव्हा काही निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या विद्वत्तेला किंवा शहाणपणाला आव्हान देता येणार नाही. त्या-त्या परिस्थितीला अनुसरून काळानुरूप निर्णय घेतले जात असतात. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आव्हान देऊन कसे चालेल?, असेही जोशी म्हणाले.

आय एम विथ यू...

जो न्यायाधीश बोलत नसतो तो घातक असतो. मी वकील असताना कोर्टात अशिलाची बाजू मांडत असताना न्यायाधीशाने मला 'आय एम विथ यू, असे सांगत युक्तिवाद थांबवण्यास सांगितले त्यानुसार मी युक्तिवाद थांबवला. परंतु नंतर विरुद्ध पक्षाच्या बाजूने निकाल दिला. न्यायाधीश जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा न्यायालयात आपण केलेला युक्तिवाद किंवा मुद्दे न्यायाधीशाला पटले आहेत किंवा नाहीत, हे वकिलाच्या लक्षात येत नाही.'

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत