शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्याला ड्रग्सचा विळखा, मागच्या वर्षी एकूण 77 प्रकरणं नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:37 IST

गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याला आता ड्रग्सचा विळखा बसू लागला आहे.

मडगाव: गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याला आता ड्रग्सचा विळखा बसू लागला आहे. मागच्या वर्षी या जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 77 प्रकरणे घडली असून, या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. 2017 साली याच जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 60 प्रकरणे नोंदविण्यात आली होती.मागच्या वर्षी अमली पदार्थाच्या सर्वात जास्त प्रकरणे मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या पोलीस ठाण्यात एकूण 17 प्रकरणे नोंदविण्यात आली असून, एकूण 22 जणांना अटक केली होती. त्यानंतर फोंडा पोलीस ठाण्याचा क्रमांक लागत असून, तेथे मागच्या वर्षी 16 प्रकरणांची नोंद आहे. वास्को पोलीस ठाण्यात 12 तर कोलवा व काणकोण पोलीस ठाण्यात प्रत्येकी हा प्रकरणे नोंद असून, वेर्णा 4, कुंकळळी, फातोर्डा व कुडचडे प्रत्येकी तीन तर मायणा - कुडतरी व कुळे पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन प्रकरणे घडली आहे. केपे, सांगे व मुरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रकरणांचा समावेश आहे.आकडेवारीनुसार मडगाव, फोंडा, वास्को, कोलवा व काणकोण येथे ड्रग्स प्रकरणात वाढ झाली आहे अशी माहिती मिळत आहे. या ड्रग्स व्यवहारत बहुतांश परराज्यातील लोक गुंतले असल्याचेही पोलीस तपासात आढळून आले आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यातील लोकांचा यात समावेश आहे. 2012 साली या जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 12 घटना घडल्या होत्या. तर 2013 साली हा आकडा चार इतका होता. 2014 साली एकूण सहा प्रकरणे घडली होती. तर 2015 साली हा आकडा 8 इतका होता तर 2016 साली 13 प्रकरणे या जिल्ह्यातील पोलिसांनी नोंदविली होती. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलीस कारवाई करतात. लोकांमध्ये विशेषता युवा वर्गामध्ये जागृती केली जात आहे.

टॅग्स :goaगोवा