शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थाननंतर गोव्यात होणार माध्यमांची मुस्कटदाबी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 19:44 IST

प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे. 

पणजी - प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे. माद्यमांवर निर्बंध लादणारे कायदे भाजप सरकार देशभर बनवू पाहत आहे. राजस्थानमध्ये सध्या प्रयोग सुरू आहे. राजस्थान सरकारच्या या हरकतीमुळे लोक संतप्त झाले आहेत. परंतु लोकांच्या विरोधाला न जुमानता हुकूमशाही चालविण्याचा सरकारचा डाव दिसत आहे. राजस्थानमध्ये या लोकांचे साधले तर गोव्यातही ते प्रयत्न निश्चितच होतील असे नाईक म्हणाले. राजस्थान सरकारचा अद्यादेश सध्या कायद्याच्या कात्रीत अडकला असून घटनात्मक मुल्यांच्या विरोधात तो असल्याचे त्यांनी सांगितले. तियात्रवर जीएसटी लावण्याच्या सरकारच्या कृतीचा नाईक यांनी विरोध केला. तियात्र  हा गोव्याचा आवडता नाट्य प्रकार आहे. विशेष करून ख्रिस्ती लोकांत हा अत्यंत प्रिय नाट्य प्रकार आहे. तियात्रवर लागू करण्यात आलेला जीएसटी ताबडतोब मागे घेण्यात यावा, मग ते कंपन्यांचे तियात्र असो किंवा खाजगी, असे ते म्हणाले. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी तियात्रवरील जीएसटी मागे घेतला जाणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले आहे. परंतु जीएसटी प्रकरणात राज्य सरकारला किती अधिकार आहेत त्यावरही बरेच काही अवलंबून आहे असे ते म्हणाले.  

‘सुदिरसूक्त वाचले नाही’माजी आमदार विष्णू वाघ यांच्यावर त्यांच्या सुदिरसूक्त या कवितासंग्रसासाठी गुन्हा नोंदविण्यात आल्याच्या प्रकरणात शांताराम नाईक यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा त्यांनी अद्याप आपण सुदिरसूक्त वाचले नसल्याचे सांगितले. गुन्हा नोंदवून चार दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कॉंग्रेस पक्ष प्रतिक्रिया का व्यक्त करीत नाही असे विचारले असता कॉंग्रेस कोणत्याही प्रकरणात प्रतिक्रिया देण्यापासून पळ काढत नसल्याचे ते म्हणाले. सुदिरसूक्त पुस्तक आपण वाचणार आहे आणि नंतर निश्चितच प्रितिक्रिया देणार आहे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाMediaमाध्यमे