पणजी : वीज खात्याने दसऱ्याच्या दिवशी राजधानी पणजी व पूर्ण तिसवाडी तालुक्याला भारनियमनाचा (लोड शेडिंगचा) शॉक दिला. पूर्ण तिसवाडी तालुक्यासह आसपासच्या भागातही भारनियमन सुरू झाले आहे. हा प्रकार यापुढेही एक-दोन दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती मिळाली. थिवी येथे पुन्हा एकदा ११० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीत बिघाड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी बिघाड झाल्याने तिसवाडीला फटका बसला होता. पणजी व ताळगावमध्येही विजेचा पुरवठा सुरळीत नव्हता. अर्धा दिवस वीज खंडित राहिल्याने ताळगावमध्ये लोकांचे हाल झाले. शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एकदा विजेने तिसवाडी तालुक्याला व आसपासच्या भागांना शॉक दिला. दसऱ्याच्या सणाचा आनंद लुटणाऱ्या गोमंतकीयांना लोड शेडिंगच्या समस्येला सामोरे जावे लागले. थिवी येथे पुन्हा एकदा बिघाड झालाच. शिवाय जुनेगोवे ते पणजी अशा बायपास मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम गतीने सुरू असल्याने त्या कामावेळीही वीज केबल तोडण्यात आले. वीज खात्याची केबल कोठून जाते याची कल्पना बांधकाम खात्याच्या कंत्राटदारास नाही. कल्पना असली तरी, काहीवेळा मजुरांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत पणजी व पूर्ण तिसवाडी (पान २ वर)
दसऱ्यावेळी लोड शेडिंगचा ‘शॉक’
By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST