शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकूण सहा प्रकरणात कामाक्षी फॉरेक्स विरोधात सीबीआयचे आरोपपत्र, 900 ग्राहकांना सुमारे 55 कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:30 IST

जादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोटय़वधींची गुंतवणूक करुन घेऊन नंतर जवळपास 900 गुंतवणूकदारांना तब्बल 55 कोटींचा फटका घालणा:या मडगावातील कामाक्षी फॉरेक्स

 मडगाव :  जादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोटय़वधींची गुंतवणूक करुन घेऊन नंतर जवळपास 900 गुंतवणूकदारांना तब्बल 55 कोटींचा फटका घालणा:या मडगावातील कामाक्षी फॉरेक्स प्रा. लि. या कंपनीच्या तीन संचालकांविरोधात या प्रकरणात तपास करणा:या सीबीआयने तब्बल सहा प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.आतार्पयत या आस्थापनाविरोधात 11 वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे नोंद झाले असून इतर प्रकरणात येत्या चार महिन्यात सीबीआय आरोपपत्र दाखल करेल अशी माहिती सुत्रकडून मिळाली. या कंपनीचा मालक निलेश रायकर, त्याची पत्नी निलिमा व आई रेखा यांच्याविरोधात ही आरोपपत्रे दाखल झाली आहेत. यापूर्वी या तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्या तिघांही जणांना जामीनावर मुक्त करण्यात आले.या प्रकरणाची पाश्र्र्वभूमी अशी की, 2004 मध्ये विदेशी चलनाची देवाण-घेवाण करणारे तसेच ग्राहकांकडून गुंतवणूक करुन घेणारे हे आस्थापन सुरु झाले होते. ज्या ग्राहकांनी या कंपनीकडे गुंतवणूक केली होती त्यांना सर्वसाधारण बँकांपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र 8 एप्रिल 2016 रोजी या आस्थापनाच्या मडगावच्या कार्यालयास टाळे ठोकल्याने गुंतवणूकदारांमध्ये हलचल माजली होती. यानंतर कित्येक ग्राहकांनी मडगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. कालांतराने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर ग्राहकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होत्या त्यानुसार हे 11 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.