शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकच खाण लिज अस्तित्वात

By admin | Updated: September 17, 2014 01:28 IST

सरकारचे केंद्रास पत्र : २७ लिजांबाबत मौन

पणजी : गोव्यात सध्या एकच खनिज खाणीचे लिज अस्तित्वात आहे, असे गोवा सरकारचे खाण सचिव पवन के. सेन यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयास एका पत्राद्वारे कळविले आहे. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २७ खनिज लिजांविषयी त्या पत्रात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोवा सरकारला १६ मे २०१४ रोजी पत्र लिहिले होते व सर्वोच्च न्यायालयाच्या २१ एप्रिल २०१४ रोजीच्या निवाड्यानंतर गोव्यात किती खनिज लिजेस अस्तित्वात आहेत, अशी विचारणा केली होती. सर्वोच्च न्यायालयाने वार्षिक २० दशलक्ष टन खनिज उत्खनन मर्यादा निश्चित केली आहे. त्याबाबतही मत प्रदर्शन करण्यास व त्या २० दशलक्ष टनांची कार्यवाही कशी केली जाईल, याविषयी भाष्य करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्याच्या खाण सचिवांना सांगितले होते. त्यानुसार खाण सचिवांनी जे उत्तर केंद्र सरकारला पाठवले आहे, त्या पत्राची प्रत ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. गोव्यात २०१८ सालापर्यंत अस्तित्वात राहील असे सध्या एकच लिज आहे, असे खाण सचिव सेन यांनी पत्रात म्हटले आहे. दहा खाण लिजेस डिम्ड एक्सटेन्शन कलमाखाली वैध आहेत. १९६० सालच्या डिम्ड एक्सटेन्शन तरतुदीनुसार या दहा लिजेसधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. डिम्ड मायनिंग लिजखाली सादर झालेल्या अन्य अर्जांबाबत २०१३ सालच्या सुधारित खाण धोरणानुसार निर्णय घेतला जाईल, असेही पत्रात म्हटले आहे. हायकोर्टाच्या एका निवाड्यानुसार, आणखी एका म्हणजे ४२-५६ टीसी क्रमांकाच्या लिजचा डिम्ड मायनिंग कालावधी वाढवला गेला आहे. पर्यावरण मंत्रालयाने लिजेसना ईसी देताना उत्खनन मर्यादा लागू करावी. गोवा सरकार मंत्रालयाच्या त्याबाबतच्या अधिकारांच्या आड येणार नाही. गोवा सरकार २० दशलक्ष टन उत्खननाच्या मर्यादेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार अंमलबजावणी करील, असे पत्रात म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)