शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नाला पद्धतीत होणार महत्वपूर्ण बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:19 IST

राज्यात नाला पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे.  तिन्ही बाजूने काँग्रेसने बांधण्यापेक्षा दोन बाजूने काँक्रीट व खालची बाजू मातीची असणार आहे.

ठळक मुद्देराज्यात नाला पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. तिन्ही बाजूने काँग्रेसने बांधण्यापेक्षा दोन बाजूने काँक्रीट व खालची बाजू मातीची असणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत जीरावे या हेतूने हा बदल करण्यात येणार आहे.

पणजी - राज्यात नाला पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे.  तिन्ही बाजूने काँग्रेसने बांधण्यापेक्षा दोन बाजूने काँक्रीट व खालची बाजू मातीची असणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत जीरावे या हेतूने हा बदल करण्यात येणार आहे.

 गोवा विधानसभेत सांताक्रूजचे आमदार टोनी फर्नांडीस यांनी ही महत्त्वपूर्ण सूचना सभागृहात जलस्रोत मंत्र्यांना केली होती. त्यांच्या मतदारसंघातील नाला पद्धती सदोष असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन्ही बाजूने काँक्रीट आणि खालचा पायाही काँक्रीटचा असल्यामुळे नाल्यात पाणी जीरत नाही. नाल्यातून सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. म्हणून नाले बांधण्याची सदोष पद्धत बंद करावी. खालच्या बाजूने काँक्रीट वापरू नये अशी त्यांची मागणी होती. 

त्यावर उत्तर देताना स्वत: एक अभियंते असलेले जलस्रोत मंत्री फिलीप नेरी यांनी ही अत्यंत महत्त्वाची सूचना असल्याचे सांगितले आहे. नाल्यांचं डिझाईन निश्चित करण्यात आलेलं आहे, असे असतानाही तो आता बदलून घेतलं जाईल. दोन बाजूने काँक्रीट व खालच्या बाजूने काँक्रीटशिवाय नाल्याचे बांधकाम असणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. 

सीझेडएमपी आणि कचरा प्रश्नावर गोवा रणकंदन; मंत्र्यांचे एनजीओंवर तोंडसुख

गोव्यात सध्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यापासून कचरा प्रकल्पाचा वाद गाजत आहेत. किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा अर्थात सीझेडएमपी वरून जनसुनावणी घेणाºया सरकारला नागरिकांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. शनिवारी राज्याचे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांना मडगाव येथील रवींद्र भवनात झालेल्या जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी सळो कि पळो करून सोडले. दुसरीकडे आज रविवारी राजधानी पणजी शहरापासून अवघ्या सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्पावरून वादंग झाला. सरकारने लोकांची समजूत काढण्यासाठी जुने गोवे येथे जनसुनावणी बोलावली होती. या जनसुनावणीला स्थानिकांनी कचरा प्रकल्पाला जोरदार विरोध करून सरकारवर नामुष्की आणली.  गोव्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने नागरिक अधिक जागरुक असल्याचे दिसून येत आहे. बिगर शासकीय संघटना राज्यात सक्रिय झालेल्या आहेत. सुमारे ३ हजारहून अधिक एनजीओ राज्यात आहेत.  पर्यावरणप्रेमी तसेच एनजीओ संघटनांच्या बाबतीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोव्याच्या मंत्र्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. 

 

टॅग्स :goaगोवा