शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपाद नाईक? संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा

By काशिराम म्हांबरे | Updated: February 14, 2024 18:08 IST

आपण ही घोषणा आपण करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलं सुतोवाच

काशीराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: लवकरच संपन्न होणाºया उत्तर गोवा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव निश्चित मानले जाते. उत्तर गोव्यासाठी भाजपतर्फेलोकांना हवा तोच उमेदवार दिला जाईल. हा उमेदवार कोण हे लोकांना ठाऊक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांनी केले. उत्तर गोव्यासाठी निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा करुन श्रीपद नाईक यांचेच नाव निश्चीत झाल्याचे संकेत त्यांनी दिले.

उत्तर गोव्यासाठी पक्षाचा उमेदवार कोण असेल हे सर्वांना ठाऊक आहे. उमेदवाराची घोषणा पक्षाकडून अधिकृत रित्या केली जाणार आहे.  त्यामुळे उमेदवार कोण हे माहित असूनही त्याची घोषणा आपण करू शकत नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

म्हापसातील पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, निळकंठ हळर्णकर, आमदार जेनीफर मोन्सेरात, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई तसेच मगोपचे आमदार जीत आरोलकर अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.मागील १० वर्षात केंद्राकडून राज्य सरकारला ३० हजाराहून जास्त कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी देण्यात आला. त्यातून अनेक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी रोहन सदानंद तानावडे,रोहन खंवटे, श्रीपाद नाईक, निळकंठ हळर्णकर, मायकल लोबो आदी नेत्यांची भाषणे झाली. पक्षाचे महासचिव राजसिंग राणे यांनी सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा