शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

११ इंच पिंपळपानावर श्रीराम प्रतिकृती; ऐतिहासिक क्षणाचे औचित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2024 08:13 IST

राजाराम परब यांची साकारले अविश्वसनीय चित्र 

दुर्गादास गर्दे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच येथील कलाकारांमध्येही उत्साह संचारला आहे. कलाकारांची खाण असलेल्या डिचोलीतील कलाक्षेत्रातील 'राजा', निवृत्त कलाशिक्षक राजाराम परब यांनी पिंपळाच्या सुमारे ११ इंच पानावर एका बाजूने श्रीरामाची प्रतिकृती, तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराचे अविश्वसनीय असे चित्र रेखाटले आहे.

प्रारंभी हे चित्र पाहताना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, की ही अद्भुत कलाकृती पोस्टर कलरने साकारली आहे. त्यांनी साकारलेल्या या अनोख्या कलाकृतीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. परब यांनी पानावरील रंग दुसऱ्या बाजूला पसरू नये, यासाठीही विशेष लक्ष दिले. अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून त्यांनी काढलेले चित्र लक्षवेधी ठरत आहे.

...असे साकारले चित्र

या कलाकृतीसाठी पिंपळाच्या पानाची निवड करून पानातील क्लोरोफॉर्म पूर्णपणे काढावा लागतो. यासाठी हे पान महिनाभर कुजवावे लागते किंवा रासायनिक प्रक्रिया करून पारदर्शक जाळीदार बनवावे लागते. नंतर खरी कसोटी सुरू होते. कारण, जाळीदार पारदर्शक पानावर पोस्टर कलरने एका बाजूने चित्र काढल्यानंतर दुसऱ्या बाजूने चित्र रंगवताना पोस्टर कलर एकमेकांत मिसळण्याची शक्यता जास्त असते. पान वाटतेय हुबेहूब पिपळपान एवढे कलात्मकतेने रंगवले की, ते पाहताना हुबेहूब खरेच वाटते. चित्र रंगवणाऱ्याचे कसब सिद्ध होते.

गोव्यातील पहिलेच कलाकार...

कलाकार आपले सर्व कौशल्य यावेळी पणाला लावून जय श्रीराम म्हणत ही कलाकृती साकारतो. त्यावेळी फक्त दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' असे म्हणण्याशिवाय आपल्याजवळ आणखी काहीच राहत नाही, असे चित्र रंगवणारे राजाराम परब हे गोव्यातील कदाचित पहिलेच कलाकार असावेत. यापूर्वी परब यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता, त्यावेळी त्यांनी अटलजींच्या चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटले होते. त्यावेळी त्यांचे कौतूक झाले होते.

 

टॅग्स :goaगोवाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या