शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, दाबोळी विमानतळावरील प्रकार

By पंकज शेट्ये | Updated: May 6, 2023 17:20 IST

बेफिकीर प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद, १७९ जणांचा जीव धोक्यात

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून चंदीगढला जाणाºया ‘इंडिगो एअरलाइन्स’ च्या विमानात एका प्रवाशाच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी व केबिन क्रू सदस्यांसह १७९ जणांचा जीव धोक्यात आला होता. विमानातील प्रवासी विशाल शांडिल्य (वय २८, रा. हिमाचल प्रदेश) याने आपत्कालीन दरवाजाचे हँडल खेचल्याने विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. गुरुवारी (दि. ४) ही घटना घडली होती.

दाबोळी विमानतळावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगढला जाणाºया ‘इंडिगो एअरलाइन्स’ च्या विमानातील प्रवाशी विशाल यांने निष्काळजीपणाने ‘ओव्हर विंग कव्हर फ्लॅप’ आणि आपत्कालीन दरवाजाचे कंट्रोल हँडल खेचले. त्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला. आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या प्रकाराने विमानात फक्त तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे विमानातील क्रू सदस्य आणि प्रवासी अशा सर्व १७९ जणांना विमानातून खाली उतरविण्यात आले. नंतर विमानाची दुरूस्ती करून तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुसºया दिवशी त्या विमानाने दाबोळीवरून उड्डाण केले.

दरम्यान, या प्रकरणी शानवा शेख यांनी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विशाल शांडिल्य यांच्याविरुद्ध भादंस कलम ३३६ अन्वये गुन्हा नोंदवला. विमानतळ पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गावकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सुदैवाने धोका टळला...

हिमाचल प्रदेशातील प्रवासी विशाल याने नेमका असा प्रकार का केला?  याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्याने निष्काळजीपणाने आपत्कालीन दरवाजाचे हँडल खेचल्याचे पोलीसांना अजूनपर्यंतच्या चौकशीत समजले आहे. सुदैवाने विमानात फक्त तांत्रिक बिघाड होऊन पुढील धोका टळला.

टॅग्स :airplaneविमानgoaगोवा