शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पैसे देत नसल्याने मुलाने वडिलांवर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 23:00 IST

वेर्णा पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास मुत्तप्पा यास ३२६ कलमाखाली अटक केली.

वास्को: दक्षिण गोव्यातील झुआरीनगर, बिर्ला येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मुत्तप्पा कंटी याने त्याचे वडील बसप्पा कंटी (वय ६५) यांच्यावर लाकडी फळीने डोक्यावर हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर बांबोळीच्या गॉमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. बसप्पा काही काळापूर्वी निवृत्त झाल्याने त्यांना मिळालेल्या निवृत्ती रकमेपैकी काही पैसे मुत्तप्पाने मागण्यास सुरुवात केली असता, यास नकार दिल्याने त्याने वडिलावर बुधवारी (दि. ८) हल्ला केला. वेर्णा पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास मुत्तप्पा यास ३२६ कलमाखाली अटक केली.वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सदर प्रकरण घडले. झुआरीनगर येथे असलेल्या जुन्या पेट्रोल पंपसमोर ६५ वर्षीय बसप्पा कंटी आपल्या दोन मुला व एका मुलीसहीत घरात राहतो. बसप्पा काही काळापूर्वी जेथे काम करत होता, तेथून निवृत्त झाल्यानंतर त्याला एक चांगली रक्कम मिळाली. बसप्पा याचा ३५ वर्षीय अविवाहित मुलगा मुत्तप्पा बेरोजगार असल्यानं तो वडीलांकडे पैशांसाठी तगादा लावत होता. बसप्पा त्याला पैसे देत नसल्याने दोघात या विषयावरून बुधवारी वाद निर्माण झाल्यानंतर मुत्तप्पाने बसप्पाच्या डोक्यावर लाकडी फळीने जबर हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. सदर मारहाणीच्या प्रकरणात बसप्पा यांच्या डोक्याला तसेच चेह-याला गंभीर जखमा झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी देऊन त्यांच्यावर सध्या गॉमेकॉ इस्पितळात उपचार चालू असल्याचे सांगितले.उपचार घेत असलेल्या बसप्पा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वेर्णा पोलिसांकडून मिळाली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास ३५ वर्षीय मुत्तप्पा यास अटक केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी सांगितले. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा