शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:43 IST

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

पणजी : गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राज्य नेतृत्त्वहीन बनले असून जनता हवालदिल झाली असल्याचे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे. नाईक म्हणतात की, सरकारात घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत:च राज्यात आणीबाबणीसदृश स्थिती असल्याचे विधान केल्याने सर्व काही स्पष्ट होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य नेतृत्त्वहीन बनले आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच पर्याय आहे. 

खाणबंदी तसेच इतर गंभीर समस्या राज्यासमोर असताना राज्याला नेतृत्त्व नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर बोलणाराही कोणी नाही. १६ मार्चपासून खाणी बंद होणार असल्याने खाणींवरील कामगार, ट्रकमालक, बार्जवाले सर्व संकटात आहेत. त्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार गटाकडून या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा करता येणार नाही. कोणत्याही प्रश्नावर या तिघांमध्ये मतैक्य होणे अशक्य आहे कारण या तिघांची विचारसरणी भिन्न असल्याचे राखी नायक म्हणतात. त्यामुळे या मंत्रिगटाने अजून खाणींच्या प्रश्नावर एकही बैठक घेतलेली नाही. 

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांवर लोक अवलंबून राहू शकत नाहीत कारण हे नेते तेवढे कार्यक्षमही नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, जेणेकरुन केंद्राच्या हातात सत्ता जाईल आणि गोव्यातील जनतेलाही दिलासा मिळेल. खास करुन खाण भागातील लोकांना दिलासा मिळेल, असे  नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शिवसेना हा राज्यातील लहान पक्ष असला तरी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनेने केलेल्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरShiv Senaशिवसेना