शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात प्रकल्प, १२०८ रोजगार; १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:13 IST

येथे साकारणार प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात रोजगार निर्मिती करणारे ७ नवीन प्रकल्प येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य गुंतवणूक मंडळाने काल १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा गुंतवणूक मंडळाची बैठक काल पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

१२०८ रोजगार निर्माण होणार आहेत. आगामी प्रकल्पातून यापैकी मरिटाईम ग्लोबल लॉजिस्टिक्स अॅण्ड वेअरहाऊस कार्पोरेशनचा लॉजिस्टिक प्रकल्प हा सर्वांत मोठा असून यात ४९.२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून ४९२ रोजगार उत्पन्न होणार आहेत, अशी माहिती गुंतवणूक मंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. हा प्रकल्प वेर्णा औद्योगिक वसाहतीत होणार असून २४ हजार चौरस मीटर जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे.

येथे साकारणार प्रकल्प

७ पैकी ३ प्रकल्प वेर्णा औद्योगिक वसाहतीत येणार आहेत, तर २ प्रकल्प सांगे औद्योगिक वसाहतीत येणार आहेत. पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत आणि पंचवाडी औद्योगिक वसाहतीत प्रत्येकी एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प हे अन्न प्रक्रिया प्रकल्प आहेत, चार प्रकल्प उत्पादन, तर एक लॉजिस्टिक्स प्रकल्प आहे.

 

टॅग्स :goaगोवा