शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणा-यांचे फोटो पाठवा, गोवा सरकारची नवीन योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 17:43 IST

पोलीस खात्याने वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी केलेल्या गोवा सेंटिनल योजनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणा-यांवर कारवाई करण्यासाठीही योजना बनविण्याच्या तयारी सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

पणजी : पोलीस खात्याने वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी केलेल्या गोवा सेंटिनल योजनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणा-यांवर कारवाई करण्यासाठीही योजना बनविण्याच्या तयारी सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. कचरा फेकताना फोटो खेचून तो संबंधित प्राधिकरणाला पाठविणे असेही त्याचे स्वरूप असू शकते. परंतु अद्याप ते जाहीर करण्यात आलेले नाही.येत्या घटकराज्य दिनापर्यंत गोवा कचरामुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोवा सेंटिनल अवॉर्ड योजनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणा-यांनाही कॅमे-यात टिपण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळ किंवा स्थानिक पालिकेकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल. विशेष सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. गुरुवारी नगरपालिकांच्या १४ सेवा आॅनलाइन केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्याला पुष्टी दिली आहे.पालिका प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. पोलीस खाते सेंटिनल योजनांचे कशा पद्धतीने संचालन करते त्यावरून अशा प्रकारच्या योजनांत लोक मोठ्या प्रमाणावर आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा प्रतिसाद मोठा आणि तशी योजना बनविताना व्यवस्था अपुरी अशी परिस्थिती होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान पोलीस खात्याने सुरू केलेल्या सेंटिनल योजनेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद दुप्पट झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांची ती उल्लंघने करताना फोटो टिपणे आणि वाहतूक खात्याला पाठविणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. त्यानंतर अधिक उल्लंघने पाठविणा-याला आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यावेळी सर्वाधिक उल्लंघने टिपणा-याला आल्टो मारुती कार इनाम दिली जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर योजनेत सहभागी होणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या विरोधात योजना बनविताना इनामांचा समावेश होणार की नाही हेही अद्याप ठरलेले नाही.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर