शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अतिरेकी शिरण्याचा तो 'अलर्ट' खोटा; सागर कवच प्रात्यक्षिकाचा होता भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:36 IST

या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पणजी:  गोव्यात समुद्रमार्गे अतिरेकी शिरण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाने आणि समुद्रात संचार करणाऱ्यांनी सतर्क रहावे, असा अलर्ट गुप्तचर विभागाकडून देण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आज संध्याकाळी हा अलर्ट खोटा असल्याचे निष्पन्न झाले. राज्यात सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. समद्रमार्गे आत शिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कॅप्टन ऑफ पोर्टस, तटरक्षक दल आणि किनारा पोलीस विभागाकडून संयुक्तरित्या या कारवाया सुरू आहेत. याच प्रात्यक्षिकांचा भाग म्हणून आज सकाळी अतिरेकी गोव्यात घुसण्याचा अलर्ट जारील करण्यात आला होता. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी तशी माहिती पत्रकार व इतरांना पहिल्या दिवशी दिली नसल्यामुळे खरोखरच अतिरेकी अलर्ट आहे की काय, असे अनेक लोकांना वाटले. खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी 'दैनिक लोकमत'चा फोन दिवसभर खणखणत होता. काही वृत्तपत्रांनी अतिरेकी अलर्टच्या बातम्याही छापून आणल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडला. विशेष म्हणजे पोलिस खात्याला कोणताही अलर्ट नाही आणि कॅप्टन ऑफ पोर्ट व तटरक्षक दलाला अलर्ट आहे असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारचा अलर्ट असण्याची शक्यता फारच कमी असते. भारतीय गुप्तचर विभागाकडून अलर्ट आलेला असल्यास तो गोवा पोलिसांना जाणे अनिवार्य असते. त्यामुळे हा प्रात्यक्षिकांचाच भाग असावा हे स्पष्ट झाले होते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर देशाला समुद्रामार्गे धोका संभवू शकतो, हे पहिल्यांदाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवण्यात यावी, यासाठी सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली. एकाचवेळी जमिनीवर, किनाऱ्यांवर आणि समुद्रात ही प्रात्यक्षिके होतात. नकली अतिरेक्यांकडून नकली बॉम्बही ठेवले जातात. नियोजित जागी बॉम्ब ठेवण्याचे आव्हान काही जणांकडे असते तर त्यांना रोखण्याचे आणि बॉम्ब ठेवल्यास ते शोधून काढण्याचे आव्हान इतर पोलिसांवर असते. 

टॅग्स :goaगोवाTerror Attackदहशतवादी हल्ला