शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पाण्याचा गैरवापर, म्हणून योजनाच केली बंद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:49 IST

आगशी व नावशी येथील जलप्रकल्पांचे उद्घाटन.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मोफत पाणी देण्याच्या योजनेचा लोकांनी गैरफायदा घेतला. काहींनी चार-चार मीटर घेतले. त्यामुळेच सरकारने मोफत पाणी योजना बंद केली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

'हर घर नल से जल' या योजनेअंतर्गत सांतआंद्रे मतदारसंघातील आगशी व नावशी येथील जलप्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या दोन्ही प्रकल्पांचा एकूण खर्च २१ कोटी रुपये आहे. ग्रामीण भागातील घरांना नळांद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प हाती घेतले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने मध्यंतरी मोफत पाणी देण्याची योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला. काहींनी तर चार-चार मीटर घेतले. त्यामुळेच सरकारने ही योजना बंद केली. लोकांनी पाण्याचा वापर सांभाळून करावा. गाडी धुण्यासाठी, गार्डनमध्ये पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केली. राज्य सरकार 'हर घर नल से जल' यशस्वीपणे राबवली जात आहे. त्याच धर्तीवर शौचालय सुद्धा प्रत्येक घराला असावे, या उद्देशाने सरकार काम करीत आहे. 

जल, शौचालय, रस्ता, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा सर्वांना मिळाव्यात हे ध्येय आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार, तेव्हा म्हणजेच २०४७पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून, त्या दिशेने सातत्याने काम करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्या उपस्थित होते.

जनतेपर्यंत पाणी पोचण्यासाठी सरकार ४० टक्के आर्थिक नुकसान सोसते. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सरकारला प्रति क्युबिक लिटर २० रुपये खर्च येतो. मात्र, सरकार प्रति क्युबिक लिटर मागे जनतेला केवळ ४ रुपये इतकाच शुल्क लागू करते.

टाक्यांची दुरुस्ती हवी

सांतआंद्रेतील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती हाती घेतली जात आहे. पाण्याचे संवर्धन व्हावे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा आपण आभारी आहे, की मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले, असे आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत