शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सरपंच व नगरसेवकांना मालमत्तेचा तपशील द्यावा लागणार, लोकायुक्तांकडून प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:43 IST

गोव्यातील सर्व पंच सदस्य, सरपंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्य यांना आपल्या मालमत्तेविषयीचा तपशील लोकायुक्तांना यापुढे सादर करावा लागेल.

पणजी : गोव्यातील सर्व पंच सदस्य, सरपंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्य यांना आपल्या मालमत्तेविषयीचा तपशील लोकायुक्तांना यापुढे सादर करावा लागेल. गोव्याच्या लोकायुक्तांकडून त्याविषयीच्या एका याचिकेची दखल घेऊन प्राथमिक प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

मंत्री व आमदारांप्रमाणेच सरपंच, पंच, नगराध्यक्ष,  नगरसेवक यानी लोकायुक्तांना दरवर्षी स्वत:च्या मालमत्तेविषयीचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. गोवा लोकायुक्त कायद्यात तशी तरतुद आहे पण नगरसेवक, पंच तसेच जिल्हा पंचायत सदस्यही कधीच या तरतुदीचे पालन करत नाहीत. बहुतांश आमदार व मंत्री स्वत:चा तपशील देत असतात.

आरटीआय कार्यकर्त्यांनी नुकतीच लोकायुक्त पी. के. मिश्रा यांना याचिका सादर केली व गोवाभरातील पंच, नगरसेवक वगैरे मालमत्तेचा अहवाल सादरच करत नाहीत याकडे लोकायुक्तांचे लक्ष वेधले. लोकायुक्तांनी या याचिकेच्या अनुषंगाने नुकतीच पहिली सुनावणी घेतली. याचिकादाराचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले व आता पंचायत संचालक, पालिका प्रशासन संचालक आणि जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याना पत्र लिहिले आहे. गोव्यातील सर्व पंचायती, नगरपालिका आणि जिल्हा पंचायत सदस्यांची नावे व पत्ते असलेली यादी येत्या महिन्यात लोकायुक्तांना सादर करावी, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. ती यादी मिळाल्यानंतर लोकायुक्त पुढील भूमिका ठरवणार आहेत.

दरम्यान गोव्यातील ज्या मंत्री व आमदारांनी आपल्या मालमत्तेविषयीचा तपशील सादर केला नव्हता त्यांना लोकायुक्तांकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत येत्या 18 आॅक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर अशा आमदारांची नावे सार्वजनिक करण्याची तरतुद लोकायुक्त कायद्यात आहे. लोकायुक्तांनी यापूर्वी याविषयीचा अहवाल राज्यपालांना सादर केला आहे.

टॅग्स :goaगोवा