शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साळगावकर क्लबचा मोठा विजय

By admin | Updated: May 3, 2014 14:20 IST

गोवा फुटबॉल संघटना आयोजित २० वर्षाखालील प्रथम विभागीय लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर स्पोर्टस् क्लबने गोवा वेल्हा स्पोर्टस् क्लबवर ८-० असा मोठा विजय मिळवित पूर्ण गुण प्राप्त केले.

वास्को : गोवा फुटबॉल संघटना आयोजित २० वर्षाखालील प्रथम विभागीय लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर स्पोर्टस् क्लबने गोवा वेल्हा स्पोर्टस् क्लबवर ८-० असा मोठा विजय मिळवित पूर्ण गुण प्राप्त केले. वास्को टिळक मैदानावरील या लढतीत साळगावकरने पहिल्या सत्रात चार गोल तर उत्तरार्धात चार गोल करीत आठ गोलांची नोंद केली. साळगावकरच्या रेमन फर्नांडीसने हॅट्रीक साधली तर आल्वीनो परेराने दोन गोल केले. जेम्स फर्नांडीस, ऑलिस्टे मेंडीस, सुबर्ट कुलासोने प्रत्येकी एका गोलची नोंद केली. -----------------------साळगाव स्पोर्टींग क्लब उपांत्यपूर्व फेरीत वास्को : जॉनी डिसोझाने नोंदलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर साळगाव स्पोर्टिंग क्लबने साई अवतार हणजुणाचा १-० गोलने पराभव करीत तिसर्‍या पर्रा पंचायत कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पर्रा पंचायत मैदानावरील या लढतीचा पुर्वाध गोलशुन्य बरोबरीत राहिला होता. उत्तरार्धातील ४५० व्या मिनिटाला जॉनी डिसोझाने चेंडूला जाळीची दिशा दाखवित साळगाव स्पोर्टिंग क्लबने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर साई अवतारच्या अभिजित गोळेकरला सामनावीर म्हणून बक्षीस देण्यात आले. ---------------------------सेंट ॲँथनी असोल्डा उपांत्यफेरीतवास्को : होली क्रॉस क्लब काकोडा आयोजित १८ व्या हॉलीक्रॉस कप फुटबॉल स्पर्धेत सेंट ॲँथनी स्पोर्टस् क्लब असोल्डाने नुवे स्पोर्टस् क्लबचा टायब्रेकरवर ५-४ गोलने मात करीत स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. होडलोमोळ काकोडा मैदानावरील पहिल्या उपांत्यपूर्व सामना पूर्ण वेळेत गोलशुन्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला टायब्रेकरच्या -- विजेत्या असोल्डाने ५-४ अशी बाजी मारली. --------------------------सीएसी कासावली उपांत्यपूर्व फेरीतवास्को : सीएसी कासावलीने काणा बाणावली स्पोर्टींग क्लबवर ३-० गोलने विजय मिळवीत सेंट ॲँथनी स्पोर्टस् क्लब कोलवा आयोजित सेंट ॲँथनी युके सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साग कोलवा मैदानावरील या लढतीत सी ॲण्ड सी कासावली मध्यंतर पर्यंत १-० असा आघाडीवर होता तर उत्तरार्धात आणखी दोन गोल करीत ३-० असा विजय मिळविला. सी ॲण्ड सी कासावलीच्या आग्नेल डिसोझा, डेन्झील फर्नांडीस व मॉर्न्टीने गोल नोंदले. ----------------------------------राया स्पोर्टिंग क्लब अंतिम आठातवास्को : राया स्पोर्टिंग क्लबने फ्रेण्डस इलेव्हन बाद्याचा २-० गोलने पराभव करीत युनायटेड क्लब नेरूल आयोजित ५व्या बार्देश कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम आठात प्रवेश केला. वेरे मैदानावरील या लढतीच्या सहाव्याच मिनिटाला मॅकबर्ड फर्नांडिसने जेस्टीन बारझाच्या पासावर राया क्लबला ३-० आघाडीवर नेले होते. १४ व्या मिनिटाला डेन्सिल सिक्वेराने गोल करीत फ्रेण्डस इलेव्हनला १-१ बरोबरी साधून दिली. दुसर्‍या सत्राच्या ३९ व्या मिनिटाला रायाच्या जेस्टन बार्बोझाने चेंडूला सरळ जाळीची दिशा दाखवीत २-१ असा विजय मिळविला तर ४८ व्या मिनिटाला फ्रेण्डस् इलेव्हनच्या ऑलाफ ---- फटका बाहेर गेल्याने गोल संधी वाया गेली. ----------------------------------साळगाव स्पोर्टिंग विजयी वास्को : साळगावकर स्पोर्टिंगने कांदोळी स्पोर्टस् क्लबच्या टायब्रेकरवर ३-२ गोलने पराभव करीत साळगाव युनायटेड आयोजित ५ व्या साळगाव युनायटेड कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. डॉ. गुस्त्यांव मोंटोरेने कांदोळी मैदानावरील या लढतीत उभय संघांना पूर्ण वेळेत गोल करण्यास अपयश आल्याचे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरच्या अवलंबनावर विजेत्या साळगाव स्पोर्टिंग क्लबने ३-२ अशी बाजी मारताना कांदोळी स्पोर्टस् क्लबला पराभूत केले. ----------------------------------सेंट सावियो कळंगुट अंतिम आठातवास्को : सेंट सावियो कळंगुटने आगुस्तियश स्पोर्टस् क्लब पोंबुर्फाचा ६-१ गोलने पराभव करीत हडफडे स्पोर्टिंग क्लब आयोजित हडफडे कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम आठात प्रवेश केला. हडफडे मैदानावरील या लढतीत सेंट सावियो कळंगुटने एकतर्फी सामना जिंकताना तब्बल सहा गोलांची नोंद केली. पेद्रु गोन्साल्वीसने ३ हॅट्रीक साधली तर विजयने २ व ब्लेग हलडतकरने १ गोल नोंदविला.