शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2024 07:51 IST

काणकोण तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी नोकऱ्या विकणाऱ्या काही दलालांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दलालांना गजाआड करण्याचे आदेश पोलिसांना दिले व त्यामुळे पोलिसही कामाला लागले आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्यभर कारवाई सुरू झाली आहे. काल काणकोण तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक प्रकरणात पोलिसांनी काही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर काही जण अंडरग्राऊंड झाले आहेत, अशी माहिती मिळते. प्रियोळ मतदारसंघातील एकाने तक्रार केल्यानंतर जुने गोवे येथील पूजा नाईक हिला अटक करण्यात आली. खरे म्हणजे पूजाला पूर्वीदेखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या तक्रारीनंतरच अटक झाली होती.

साखळीतील मुख्यमंत्र्यांच्या घरी एकदा पूजा नाईक ही कुणाला तरी नोकरी देण्याचा विषय घेऊन आली होती. त्यावेळीच मुख्यमंत्र्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रार केली होती. नंतर तिला अटकही झाली होती. मात्र, लोक अजूनही तिच्यावर विश्वास ठेवून नोकरी मिळावी म्हणून पैसे देत होते. तिचे कारनामे सुरूच राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कडक सूचना केल्या. पूजा नाईक हिची सर्व नोकरी विक्रीप्रकरणे बाहेर काढण्याचे स्वातंत्र्य पोलिसांना दिले गेले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पूजाने खरेदी केलेल्या कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

राज्यातील अन्य काही व्यक्तींनीही सरकारी नोकरी देतो, असे सांगून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. काणकोण तालुक्यातील काही जणांवर पोलिसांची नजर आहे. पोलिसांनी काल तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

नोकऱ्या विक्रीच्या कामात दलाल म्हणून वावरणारे काही जण यामुळे हादरले आहेत. सध्या होणाऱ्या कारवाईमुळे काही जणांना तरी अद्दल घडली आहे, असे लोक म्हणत आहेत.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत