शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी गोव्यात जाताय? आरटीओपासून जरा सांभाळून राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 18:01 IST

आरटीओ निरीक्षकांना दरमहिना 100 चालकांकडून दंड आकारणीचं टार्गेट

मडगाव: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसह सर्वसामान्यांना आता वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. राज्यातील आरटीओ निरीक्षकांना दर महिन्याला आता प्रत्येकी 100 जणांना दंड ठोठावण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गोव्यातील आरटीओ अधिकारी वाहन चालकांकडून किरकोळ चूक झाली, तरी दंड ठोठावू शकतात. गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना आता पोलिसांप्रमाणो आरटीओ निरीक्षकांनाही दंड आकारण्याचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे निरीक्षकांना महिन्याकाठी किमान शंभर वाहन चालकांकडून दंड वसूल करणं आवश्यक आहे. या कामात कुचराई झाल्यास पुढील महिन्यात हे प्रमाण दुप्पट होणार आहे.गोव्यातील आरटीओ निरीक्षकांची एकूण संख्या पाहता दरमहा दंड आकारण्याचे हे टार्गेट 9 हजारच्यावर जाणार आहे. यात हेल्मेटविना दुचाकी चालवणं, मद्यान करुन वाहन चालवणं, परवान्याशिवाय वाहन चालविणं तसेच खासगी वाहनांचा वापर पर्यटकांसाठी करणं या गुन्ह्यांचा समावेश आहे. सर्वात अधिक टार्गेट मडगावच्या एन्फॉर्समेंट विभागाला देण्यात आलेलं असून या विभागाला दरमहा 2000 वाहनांना दंड ठोठावण्याची सक्ती केली आहे. त्या पाठोपाठ पणजीच्या एन्फॉर्समेंट विभागाला 1400 चं टार्गेट ठेवलं आहे. विमानतळ असलेल्या वास्को आरटीओ कार्यालयाला आणि व्यापारी केंद्र असलेल्या मडगाव कार्यालयाला प्रत्येकी 700, डिचोली कार्यालयाला 600, पणजी, म्हापसा व केपे या कार्यालयांना प्रत्येकी 500, फोंडा कार्यालयाला 300 तर पेडणो, काणकोण व धारबांदोडा कार्यालयांना प्रत्येकी 200 चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. याशिवाय धारगळ, मोले व पोळे या तीन चेक नाक्यावर प्रत्येकी 300 चे तर दोडामार्ग व केरी या चेक नाक्यावर प्रत्येकी 100 चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.आरटीओ निरीक्षकांनी आपले टार्गेट पूर्ण न केल्यास दुसऱ्या महिन्यात त्यांना दुप्पट टार्गेट दिलं जात असल्यानं सध्या गोव्यातील आरटीओ अधिकारीही हवालदिल झाले आहेत. टार्गेट पूर्ण न झाल्यास शनिवारी-रविवारी कामावर येऊन टार्गेट पूर्ण करावे असं त्यांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता रात्रीच्यावेळीही आरटीओ अधिकारी पोलिसांप्रमाणे घोळक्याने गोव्यातील रस्त्यावर दिसण्याची शक्यता असून त्यांचे पहिले टार्गेट परराज्यातून येणारी वाहनं आणि पर्यटक हेच असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवा