शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आरटीआयशी प्रशासनाने पुकारला असहकार

By admin | Updated: September 17, 2014 01:27 IST

ढिम्म नोकरशाही : मुख्य माहिती आयुक्तांना कटू अनुभव

सद्गुरू पाटील-पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांनी मोठ्या प्रमाणात आरटीआय अर्जदारांना माहिती देण्याबाबत टाळाटाळच चालवली आहे. माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्य प्रशासनाने एक प्रकारे असहकारच पुकारला आहे. ढिम्म नोकरशाहीचे मुख्य माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांना अनेक कटू अनुभव येत असून सरकारनेही एकप्रकारे राज्य माहिती आयोगाची सर्व बाजूंनी नाकाबंदीच केल्यासारखी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. या प्रतिनिधीने मेहेंदळे यांची मंगळवारी भेट घेतली. मेहेंदळे यांच्या नियुक्तीला एक वर्ष झाले. त्या येत्या जानेवारीमध्ये वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करत आहेत. त्या वेळी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. नव्याने पद भरायचे असेल, तर आताच प्रक्रिया सुरू करावी लागेल; पण सरकारने प्रक्रिया सुरू केलेली नाही. गेले वर्षभर मेहेंदळे यांचे कार्यालय अत्यंत कमी मनुष्यबळाच्या आधारे कसेबसे चालत आहे. कौशल्य असलेला कर्मचारीवर्ग नाही. अनेकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली; पण काही फायदा झाला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. अतिशय कमी जागेत मेहेंदळे कसेबसे आयोगाचे काम करत आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आयोगाला दुसरीकडे जागा देण्याचा आदेश जारी झाला; पण अजून ती जागा हातात आलेली नाही. आता ती पुढील वर्षीच प्राप्त होईल, याची कल्पना मेहेंदळे यांनाही आली आहे. (पान १ वरून) आरटीआयखाली माहिती देणे कसे टाळावे याचाच विचार अनेक अधिकारी करतात. बेकायदा बांधकामबाबत आपण केलेल्या तक्रारीबाबत काय कारवाई झाली, अशी विचारणा जर अर्जदारांनी केली, तर आपल्याकडे त्याबाबतची माहिती नाही, एवढेच सरकारी अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात कारवाईही केली जात नाही व अर्जदाराला नीट उत्तरही दिले जात नाही. आपण आदेश देऊन व मग हायकोर्टाने आदेश देऊनदेखील एका पंचायतीच्या कर्मचाऱ्याने अर्जदारास माहिती दिली नाही. एका पालिकेच्या अधिकाऱ्यास आपण अर्जदाराला नुकसान भरपाई दे, असा आदेश दिला, तरी काही महिने त्या आदेशाचे पालन झाले नाही. मेहेंदळे म्हणाल्या की नोकरशाही एवढी ढिम्म आहे की, आरटीआय कायद्याचे औषध त्यासाठी खूपच कमी ठरत आहे. एका अर्जदाराने गोवा माहिती हक्क कायद्याखाली आपल्याला माहिती द्या, असे अर्जात म्हटले होते. त्यावर सरकारी अधिकाऱ्याने गोवा माहिती हक्क कायदा अस्तित्वात नाही, एवढेच उत्तर दिले. केंद्र सरकारचा २००५ सालचा माहिती हक्क कायदा अस्तित्वात आहे व त्यानुसार अर्जदारास माहिती द्यायला हवी, याकडे संबंधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. म्हणजे प्रचंड अनास्था व माहिती द्यायचीच नाही, अशी प्रवृत्ती दिसत आहे. यामुळे माहिती हक्क कायदा गोव्यात अमलात आणण्यामागील हेतू नष्ट होत आहे. प्रत्येकवेळी फाईल मिसिंग, आमच्याकडे कागदपत्रे नाहीत, आमच्याकडे नोंदी नाहीत, अशा प्रकारची उत्तरे अधिकारी देत आहेत. माहिती हक्क कायद्यात फक्त संबंधित अधिकाऱ्याला दंड ठोठविण्याची तरतूद आहे. संबंधित खाते प्रमुखाला व पहिल्या अपिलेट अथॉरिटीलाही दंड ठोठविण्याची तरतूद असायला हवी. आरटीआयबाबत अनेक खाते प्रमुख बेफिकीर आहेत.