शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म्हापसा शहराच्या नुतनीकरणावर ३५ कोटींचा खर्च अपेक्षित- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:35 IST

गोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देगोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.. या कामावार अंदाजीत ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी म्हापसाला भेट देऊन विविध अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा सुरु केली.

म्हापसा - गोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. या कामावार अंदाजीत ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी म्हापसाला भेट देऊन विविध अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा सुरु केली. या शहरातील बाजारपेठ शुक्रवारच्या बाजारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे. 

पणजी शहर स्मार्ट शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचवण्यात आल्यानंतर सरकार आता म्हापसा बरोबर राज्यातील इतर शहरे म्हापसा, मडगाव, वास्को ही शहरे विकसित करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी नगराध्यक्ष रोहन कवळेकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेले जायका हा मलनिसारण प्रकल्प डिसेंबर महिन्यात कार्यान्वीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

शहराच्या नुतनीकरणासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. या दलाचे अध्यक्षपद नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यावर जायका, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते व पाणी विभागाचे अधिकारी तसेच सुडाचे प्रतिनिधी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

जायकाच्या प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते व इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठीची प्रक्रिया पुढील दोन महिन्याच्या आत सुरु होणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी जायकाला आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलेला आहे. या संबंधीची पुढील बैठक १७ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरातील पाण्याच्या पाईपलाईन्स सुद्धा बदलण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

काल शहरात दाखल झाल्यानंतर पर्रीकर यांनी सकाळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यां समवेत चर्चा केली. त्यानंतर सब रजिस्ट्रारच्या कार्यालयाला व जुन्या आझिलो हॉस्पिटलाच्या परिसराला भेट दिली. उपजिल्हाधिकाºयाचे कार्यालय जुन्या आझिलो हॉस्पिटल परिसरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी सदर ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच कर विभाग कार्यालय सुद्धा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सब रजीस्ट्रारच्या कार्यालयाला नवी लिफ्ट बसवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा मार्केटच्या नुतनीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थ संकल्पात २० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली. या कामासाठी अंदाजीत ३५.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून पहिल्या टप्प्यात त्यावर २० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी संबंधी बोलताना पालिकेच्यावतिने त्यांना शहराच्या आराखड्या संबंधी सादरीकरण करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. तसेच पालिकेला असलेल्या समस्या व विविध योजना त्यांच्या समोर मांडण्यात आल्याची माहिती दिली. मार्केट प्रकल्पाच्या आराखड्याला सरकारकडून तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.