शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

'आरजी'चे जिंकू किंवा मरु? लोकसभा निवडणुकीत मतदार साथ देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 13:20 IST

मतदार यावेळी आरजीला साथ देतील की नाही, हे पाहावे लागेल.

- सद्गुरू पाटील

आरजीने आपली गोंयकारवादी भूमिका सोडलेली नाही. ते सेटिंगचे राजकारण करत नाहीत. भाजपशीही आरजी संघर्ष करतोय आणि काँग्रेसशीही संघर्ष करतोय, हे मान्य करावे लागेल. आरजी पक्ष रणांगणात सर्वांशी लढत आहे. मात्र यावेळी वाट खडतर आहे. मतदार यावेळी आरजीला साथ देतील की नाही, हे पाहावे लागेल. येत्या ७ मे रोजी गोव्यात मतदान होईल. आता फक्त पंधरा-सोळा दिवस शिल्लक आहेत, लोकसभा निवडणुकीचा ज्वर खूप वाढलाय, कोण पडेल व कोण जिंकेल हे सांगता येत नाही, अशा टप्प्यावर गोव्याचे वातावरण पोहोचले आहे. आम्ही शंभर टक्के जिंकू असे कोणताच पक्ष सांगू शकत नाही, अशी स्थिती आहे. 

गेल्या महिन्यात वातावरण तसे नव्हते, किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थिती तशी नव्हती. आता मतदारांची मानसिकता, समाजातील अंडरकरंट्स, रुसवेफुगवे हे सगळे नीट कळू लागलेय. होय, आम्ही तुमच्यासोबतच आहोत असे सांगणारे कार्यकर्ते किंवा सामान्य लोक कुठच्या तरी उमेदवाराला धक्का देण्यासाठी थांबले आहेत. तोंडावर हास्य पण मनात राग अशी लोकांची स्थिती अनेक पंचायत क्षेत्रांमध्ये दिसून येते. भाई लोकसभेत जाऊन काय करतील? भाऊंनी आमच्यासाठी काय केलेय? धेपेंच्या कुटुंबातील महिलेला तिकीट देण्यामागे प्रयोजन काय? विरियातो पूर्ण दक्षिणेत फिरू तरी शकणार काय? ते आरजीवाले मते फोडण्यासाठीच उभे राहिलेत की काय असे विविध प्रश्न लोक विचारतात, अर्थात लोकांचे सगळेच प्रश्न नेते गंभीरपणे घेतात किंवा घ्यावेत असे नाही, पण सामान्य माणसांत खदखद आहे हे कळून येतेच. 

मतदारांना कुणाबाबतच प्रेम नाही, सगळेच मेले तसलेच ही कष्टकरी महिलांमधील भावना आहे, बेरोजगारी, महागाई, वीज-पाणी समस्या, गरीबांची होणारी फसवणूक हे सगळे विषय लोकांना छळतात. त्यामुळे राजकारण्यांबाबत लोकांच्या मनात कटुता आहे. आम्ही मत दिले नाही तरी, ते जिंकतील मग आम्ही का मतदान करायला हवे असे विचारणारे लोक कमी नाहीत. देशाच्या काही भागांत परवा पहिल्या टप्यात तुलनेने कमी मतदान झाले, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

भाजपमध्येच भाजपच्या उमेद‌वारांसाठी काही छुपे शत्रू आहेत. मात्र याचा अर्थ उमेदवार कमकुवत झालेत असा मुळीच होत नाही. तरीही वाट सोपी आहे असे कुणी समजू नये. आताचे आमदार आणि पराभूत माजी आमदार हे एकमेकांविरुद्ध आहेत, आयात भाजप कार्यकर्ते व निष्ठावान किंवा मूळ कार्यकर्ते यांच्यात संघर्ष व गटबाजी आहे. दक्षिणणेत व उत्तर गोव्यात हा अनुभव येत आहे. शिवोलीपालून मांद्रेपर्यंत कुणीही फिरून पहावे, श्रीपाद नाईक यांची सर्वांत जमेची बाजू म्हणजे ते स्वतः कुणाला दुखवत नाहीत. शिवाय ते कधीच उत्तर गोव्यात पराभूत झालेले नाहीत. उत्तरेत मराठा समाज, भंडारी समाज आणि दक्षिणेत एसटी समाज, ओबीसी, खिस्ती मतदार यांच्या मनात जे काय चाललेय ते कळण्यासाठी जास्त अभ्यासाची कुणाला गरज नाही.

उत्तर गोव्यात पंचवीस वर्षे काँग्रेसने यशच पाहिलेले नाही. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची मते फोडण्यासाठी आरजी पक्ष नव्हता. आरजी आपली मते फोडतोय हा काँग्रेसचा दावा त्यामुळे फसवा व चुकीचा ठरत आहे. १९९८ सालची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी खूप वेगळी ठरली होती, त्यावेळी उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधी झाली नाही. काँग्रेसने यापूर्वी उत्तरेत टाइमपास करण्यासारखीच निवडणूक लढवली. यामुळे रमाकांत खलप मात्र गंभीरपणे लढत आहेत असे लोकांचे मत बनलेय, रिव्होल्यूशनरी गोवन्स या पक्षासाठी यावेळची निवडणूक ही जिंकू किंवा मरू अशी झाली आहे. कारण आरजीला आपली ९० हजार मते आणखी वाढली आहेत हे दाखवून द्यावे लागेल. 

२०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीला जी ९० हजार मते मिळाली होती, त्या मतांमध्ये जर आता भर पडली नाही तर लोक म्हणतील की आरजीत दम नाही. समजा आरजीची मने घटली व पन्नास हजारापर्यंत खाली आली तर ख्रिस्ती मतदारही बोलू लागतील की- आरजी पक्ष शक्तीहीन झाला आहे. अर्थात आरजीचे उमेदवार जिंकतील की पराभूत होतील हे सांगण्यासाठी मोठ्या राजकीय विश्लेषकांची गरज नाही, समजा आरजी आपली मते फार मोठ्या प्रमाणात वाढवू शकला तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आरजी हाच एकमेव प्रबळ प्रादेशिक पक्ष गोव्याच्या राजकारणात असेल, इतर प्रादेशिक पक्ष तेवढे प्रबळ राहणार नाहीत. 

मात्र आरजीची यावेळी लोकसभा निवडणुकीत घसरगुंडी झाली तर आरजी अधिक डिमॉरलाइज होणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. विरियातो परवा बोलले की- यावेळी लोक आपने मत वाया घालवू पाहत नाहीत. आरजीला मत देणे म्हणजे ते वाया जाणे असा विचार लोकसभा निवडणुकीत लोक करतात असे विरियाती म्हणतात. मात्र हा दावा पूर्ण सत्य मानता येत नाही. लोकांच्या मनात काय आहे हे शेवटी ७ मे रोजीच कळून येईल.

काँग्रेसच्या प्रचाराची बस उशिरा सुटलेली आहे हे मान्य करावे लागेल, भाजपचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात दोन-तीनवेळा पोहोचले आहेत. काही ठिकाणी चारवेळाही पोहोचले. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचाराची गती वाढवावी लागेल, आरजीचे मनोज परब आणि दक्षिणेतील रुबर्ट परैरा हे देखील मतदारसंघांमध्ये खूप फिरताना दिसून येतात. आरजीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर हेही खूप घाम गाळत आहेत. 

लोकसभा निवडणूक ही भाजपविरुद्ध काँग्रेस किंवा इंडियाआघाडी अशीच आहे, असे काही धर्मगुरु मानतात. काही बिशप काँग्रेसच्याबाजूने तर काही भाजपच्याबाजूने आहेत. अर्थात काहीजण आरजीच्याबाजूनेही असू शकतात, पण ते उघडपणे कुठेच नाहीत. सेक्युलर उमेदवारांना मत था असे आवाहन परवा आर्चबिशपांनी केले. हे आवाहन खरे कुणासाठी आहे ने लोकांना कळतेय.

दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात यावेळी आरजीचा प्रभाव जास्त दिसतोय. पूर्ण दक्षिण गोव्यात आपला प्रभाव दाखवू शकेल अशी रुबर्ट परेरा यांची प्रतिमा नाही. तरी देखील त्यांच्याकडून प्रचारासाठी जे कष्ट घेतले आत आहेत, ते महत्त्वाचे आहेत, मनोज परब उत्तर गौवा पिंजून काढत आहेत. आरजीची जमेची बाजू अशी की-ते स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत. त्याची भूमिका योग्य असो किंवा अयोग्य, पण त्यांनी आपली गोंयकारवादी भूमिका सोडलेली नाही, ते सेटिंगचे राजकारण करत नाहीत. भाजपशीही आरजी संघर्ष करतोय आणि काँग्रेसशीही संघर्ष करतोय हे मान्य करावे लागेल. आरजी ही भाजपची वी टीम आहे असे म्हणता येत नाही. आरजी पक्ष रणांगणात सर्वांशी लढत आहे. आरजीकडे निधी नसला तरी कार्यकर्ते घाम गाळतात फक्त मतदार कोणत्याबाजूने राहतात हे कळण्यासाठी ७ मेपर्यंत थांबावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४south-goa-pcदक्षिण गोवाnorth-goa-pcउत्तर गोवा