शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

काजू पिकासाठी 5 हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवीत करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:20 IST

राज्यात काजू लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी 5 हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेअंतर्गत कृषी खात्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येईल.

पणजी - राज्यात काजू लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी 5 हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेअंतर्गत कृषी खात्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येईल. तसे पाहता अन्य कोणत्याही राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत गोव्यात काजू लागवडीखालील जमीनीचे प्रमाण जास्त आहे.

गोव्यात दरवर्षी 55 हजार हेक्टर जमिनीत काजू पिक घेतले जाते. पोर्तुगीजांनी जमिनीची धूप रोखण्यासाठी काजू लागवड सुरु केली आणि आता हे राज्याचे नगदी पीक ठरले आहे. काजू बागायतीच्या बाबतीतही यांत्रिकीकरणाची कास धरण्यात येत आहे. काजुच्या वेगवेगळ्या जाती राज्यात उपलब्ध आहेत. वन विकास महामंडळाकडे 8 हजार 971 हेक्टर जमीन काजू लावडीखाली आहे. 2017-18 मध्ये राज्यात 58 हजार टन काजू उत्पादन झाले. 2016-17 मध्ये ते 24 हजार 369 टन तर 2015-16 मध्ये 17 हजार 549 टन इतके होते. महामंडळ स्वत: काजू काढून विकत नाही, तर त्याचा लिलाव केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 2 लाख 1 हजार रुपये उत्पन्न या लिलांवातून मिळाले. तर प्रती हेक्टर सरासरी 2,252 रुपये मिळाले आहेत. 2014-15 च्या लेखा परीक्षेत अहवालानुसार गोवा वन विकास महामंडळाला 2014-15 या आर्थिक वर्षात 26 लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे. अनेक काजू बागायतींमध्ये कीड लागण्याच्या घटनांमुळे समस्या निर्माण झालेली आहे. कीड लागण्याच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याने सुमारे 10 टक्के झाडे वर्षाकाठी नष्ट होतात, असे आढळून आले आहे. रासायनिक किटकनाशकें वापरुनच या कीडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा लागतो. प्राप्त माहितीनुसार कीटकनाशकें खरेदी करण्यासाठी कृषी खाते खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य करते. हेक्टरमागे कमाल 4,500 रुपये याप्रमाणे कमाल चार हेक्टरपर्यंत 18 हजार रुपये अनुदान दिले जाते.

टॅग्स :goaगोवा