शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

गोव्याचा महसूल घटला; 49 टक्के जीएसटी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:16 IST

केंद्राकडेच निधी नाही, मग गोव्याला कुठून देणार असा प्रश्न गोवा सरकारमधील एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विचारत आहेत.

पणजी : राज्याला आर्थिक आघाडीवर अजुनही बिकट स्थितीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार गोव्याला कोणतेही आर्थिक पॅकेज देत नाही. राज्याचा महसूल घटलेलाच आहे. गेल्या सहा महिन्यांत वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) गोव्याला मिळणाऱ्या महसुलात 49 टक्के कपात झाली आहे. म्हणजेच एवढ्या प्रमाणात कमी महसूल जीएसटीद्वारे आला आहे.केंद्र सरकारही कोविडच्या काळात जास्त महसुल मिळवू शकत नाही. केंद्रालाही आर्थिक कसरती कराव्या लागत आहेत. त्यामुळे गोव्याला जीएसटीची नुकसान भरपाई जास्त प्रमाणात मिळत नाही. केंद्राकडेच निधी नाही, मग गोव्याला कुठून देणार असा प्रश्न गोवा सरकारमधील एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विचारत आहेत. या मंत्र्याचा जीएसटीच्या विषयाचा अभ्यास आहे. केंद्र सरकारने पाच वर्षे तरी राज्यांना सगळी नुकसान भरपाई देऊ असे सांगितले होते पण जीएसटीची नुकसान भरपाई नियमितपणो मिळतच नाही. खनिज व्यवसाय बंद झाल्याने गोव्याचा महसुल अगोदरच घटला आहे, त्यात पुन्हा जीएसटीची नुकसान भरपाई मिळत नसल्याने सरकारची आर्थिक कोंडी होत आहे. चार महिन्यांपूर्वी गोव्याला एकूण महसुलापैकी 83 टक्के कमी महसुल आला. कारण लॉकडाऊन व कोरोनामुळे व्यवसायच बंद राहिले होते.जीएसटीपोटी गोवा सरकार 2 हजार 100 कोटी रुपये प्राप्त करील असे लक्ष्य होते पण फक्त 1 हजार 33 कोटींचा महसुल सरकारी तिजोरीत आला. सप्टेंबर महिन्यात साडेतीनशे कोटींचे लक्ष्य वाणिज्य कर खात्याने समोर ठेवले होते. प्रत्यक्षात फक्त 170 कोटींचा जीएसटी गोळा होऊ शकला यावरून स्थितीची कल्पना येते. गोव्यात अजून पूर्णपणो सगळे व्यवसाय सुरू झालेले नाहीत. शिवाय काही व्यापारी आता जीएसटी देखील कसा चुकवावा याचाच विचार करतात, कारण छोटे व्यापारीही आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. मूल्यवर्धीत कराचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी पेट्रोल व डिङोलची खूप मोठय़ा प्रमाणात विक्री होत असे, गेल्या एप्रिलपासून इंधन विक्रीचे प्रमाण खूप कमी झाले आहे व त्यामुळेही सरकारला कमी प्रमाणात व्हॅट येतो.

टॅग्स :GSTजीएसटी