शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

पीएमसी बँकेवरील निर्बंधामुळे म्हापसा अर्बनच्या विलीनीकरणाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:34 IST

PMC Bank Update: रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाच्या विलीनीकरणाला मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाच्या विलीनीकरणाला मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध धक्क्याचे कारण ठरले आहे. विलीनीकरणावर म्हापसा अर्बनच्या आमसभेत तीन दिवसापूर्वी ठराव मंजूर करण्यात आला.  

म्हापसा - रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाच्या विलीनीकरणाला मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध धक्क्याचे कारण ठरले आहे. विलीनीकरणावर म्हापसा अर्बनच्या आमसभेत तीन दिवसापूर्वी ठराव मंजूर करण्यात आला.  

बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियम ३५ अंतर्गत ज्या पद्धतीने सुमारे साडेचार वर्षा पूर्वी म्हापसा अर्बवर आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले होते त्याच पद्धतीने पीएमसीवर सुद्धा आर्थिक अनियमिततेचे कारण देत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. म्हापसा अर्बनातील खातेधारकांना आपल्या खात्यावरून फक्त 1 हजार रुपया काढण्याची मुभा देण्यात आलेली. त्यानंतर हे निर्बंध काही अंशी शिथील करण्यात आले होते. 

विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी म्हापसा अर्बनची शनिवारी विशेष आमसभा संपन्न झाली होती. यात सहकार क्षेत्रातील तीन बँका पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँक (पीएमसी), डोंबिवली नागरी सहकारी बँक तसेच ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) यात विलीनीकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला. घेतलेल्या निर्णयाची माहिती म्हापसा अर्बने सोमवारी राज्य सहकार निबंधकाना सादर करण्यात आलेली. पीएमसीसोबत विलीनीकरणाची चर्चा करण्यापूर्वी डोंबिवली नागरी सहकारी बँकेसोबत सुद्धा चर्चा केली होती. त्यामुळे आता टीजेएसबी या पर्याय राहिला आहे. 

विलीनीकरणाची प्रक्रिया १५ दिवसाच्या आत पूर्ण करण्याच्या हेतूने म्हापसा अर्बनकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या. अंतिम टप्प्यात आलेली ही चर्चा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त म्हापसा अर्बनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढणे बाकी होते. सुमारे साडेचार वर्षा पूर्वी म्हापसा अर्बनवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात अनेकवेळा वाढ करण्यात आली आहे. देण्यात आलेली तीन महिन्याची अंतिम मुदत वाढ १८ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून त्यापूर्वी विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनला दिला होता. 

म्हापसा अर्बनप्रमाणे पीएमसीवर सुद्धा निर्बंध लागू केले असल्याने विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे विशेष बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार डोंबिवली नागरी सहकारी बँक किंवा ठाणे जनता सहकारी बँकेसोबत विलीनीकरणाची चर्चा म्हापसा अर्बनला सुरू करावी लागणार आहे. या संबंधी म्हापसा अर्बनचे अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांना विचारले असता पीएमसी सोबत सुरु असलेली चर्चा पुढे नेण्यास अर्थ नसल्याने घेतलेल्या ठरावानुसार इतर दोन बँकासोबत चर्चा सुरु केली जाणार असल्याचे सांगितले. 

 

 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकbankबँक