शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशातील पोटनिवडणूक लढवण्याचा मगो गट समितीचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 17:02 IST

शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघापाठोपाठ म्हापसा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय मगोच्या गट समितीकडून घेण्यात आला आहे.

म्हापसा : शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघापाठोपाठ म्हापसा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय मगोच्या गट समितीकडून घेण्यात आला आहे. तसा ठराव पक्षाच्या म्हापशात संपन्न झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. मगोच्या म्हापसा गट समितीची बैठक गटाध्यक्ष अ‍ॅड. वामन पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीला मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात बाळू फडके, भारत तोरस्कर, गितेश डांगी, गिरीश कुंकळ्ळकर, रमेश, मणेरकर तसेच इतर जेष्ठ नेते उपस्थित होते. रामदास फळारी यांनी सदर ठराव बैठकीत मांडला नंतर तो सर्वमताने मंजूर करण्यात आला. घेण्यात आलेला निर्णय पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या केंद्रीय समितीला पाठवण्यात आला आहे. केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. म्हापसा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक राज्यातील इतर दोन मतदार संघा बरोबर होणार आहे. त्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदानाची तारीख जाहीर केली जाणार आहे. होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपली पूर्वतयारी सुद्धा सुरु केली आहे. पक्षाने प्रचार कार्य लवकरच सुरु केले जाणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.या तयारीचा एक भाग म्हणून डिसोझा यांच्या निधनानंतरच्या स्थितीवर व रिक्त झालेल्या जागेवर विस्तारीतपणे चर्चा करण्यासाठी सदरची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत विस्तारीतपणे चर्चा झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी मगोचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. मगोचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या म्हापसा मतदारसंघातून २०१७ साली झालेल्या विधानसभेची निवडणूक पक्षाने लढवली होती. त्यात पक्षाचे उमेदवार म्हणून बाळू फडके यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यात त्यांना ४१२९ मते प्राप्त होवून डिसोझा यांच्यानंतर दुसरे स्थान प्राप्त झाला होता.मगोचे कार्यकारी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना गट समितीने घेतलेल्या निर्णयासंबंधी विचारले असता समितीने घेतलेल्या निर्णयची प्रत अद्याप आपल्याला मिळाली नसल्याची माहिती दिली. गट समितीने निवडणूक लढवण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येणार आहे. बैठकीत त्यावर चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने उमेदवारसुद्धा लवकरच जाहीर केले जाईल.

टॅग्स :goaगोवा