शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीसाठी 1 ऑगस्टपासून प्रतिनिधी नोंदणी

By admin | Updated: July 7, 2017 20:58 IST

येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान येथे होणा-या 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) रसिकांची ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी यंदा लवकर

ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. 07 - येत्या  20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान येथे होणा-या 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) रसिकांची ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी यंदा लवकर म्हणजे 1 ऑगस्ट रोजी सुरू होईल. ही माहिती चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक सेंथील राजन यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक उपस्थित होते. इंडियन पॅनोरामा विभागासाठी अतापासूनच ऑनलाइन प्रवेश नोंदणी खुली केली आहे. यासाठी 7 ऑगस्ट रोजी ऑनलाईन नोंदणीची शेवटची मुदत आहे. नोंदणीच्या हार्ड कॉपी पाठविण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याची माहिती राजन यांनी दिली. 
इफ्फीच्या 12 महिन्यांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2016 ते 31 जुलै 2017 दरम्यान निर्मिती झालेले सीबीएफसीतर्फे प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट इंडियन पॅनोरामा विभागासाठी पात्र ठरणार अहेत. सीबीएफसीचे प्रमाणपत्र नसलेल्या चित्रपटांचे प्रवेश देखील स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रवेश आलेल्या चित्रपटांतून 26 फिचर तर 21 नॉन फिचर चित्रपटांची निवड केली जाईल. प्रत्येक चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स सक्तीची आहेत. तसेच ऑनलाइनच माध्यमाने नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. 
यातील दोन चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात स्पर्धेसाठी पाठविले जातील. यंदा देखील उत्कृष्ट नवोदित (डेब्यू) चित्रपट निर्माता पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांचा शताब्दी पुरस्कारासाठी विचार केला जाईल. 10 लाख रुपये व चांदीचा मोर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दोन चित्रपट या पुरस्कारासाठी पात्र ठरविले जातील.