शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या.

पणजी : गोव्याचा खनिज खाणप्रश्न आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचा अभ्यास करून निती आयोग आपला अहवाल देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या. विविध कायदेशीर बाबींची गुंतागुंत असल्याने सरकारला अजुनही खाण व्यवसाय सुरू करण्यात यश आलेले नाही. निती आयोगाच्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्री सावंतही त्या बैठकीत सहभागी झाले. गोव्यातील खनिज खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे व ते काम आयोगाने कराव, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. खनिज खाण प्रश्नावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने पंतप्रधान सकारात्मक आहेत. त्यांचे विषयावर लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झाडे लावण्याचा सल्ला दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना पत्रे लिहिली असून वन महोत्सवात सहभागी व्हा आणि अधिकाधिक झाडे लावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या पत्रतून केली आहे. येत्या पावसाळ्य़ात आपण सगळे एकत्र येऊया व अधिकाधिक झाडे लावूया. समाजाच्या विविध घटकांच्या सहभागाने विविध ठिकाणी झाडे लावली जावीत. मी वन खात्याला जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यासाठी सखोल अशी योजना तयार करण्यास सांगितले आहे. झाडे लावण्यासाठी जागा निवडण्याच्या हेतूने प्रत्येक आमदाराने वन खात्याला मार्गदर्शन करावे. उद्याने, बाग-बगिचे, हायस्कुल, महाविद्याले आदी ठिकाणी झाडे लावता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकांच्या निवडीनुसार लोकांना व संस्थांना वन खाते रोपटी उपलब्ध करून देईल. या उपक्रमामुळे गोव्याचे हरित क्षेत्र अबाधित राहिल. आमदारांनी अधिक माहितीसाठी मुख्य वनपाल सुभाष चंद्रा यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.