शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार कृषी जमीन पडीक कृषीखात्याचा अहवाल जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 21:18 IST

राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

पणजी: राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. राज्यातील पडीक शेतजमीन लागवडीखाली आणायची असेल तर त्यासाठी अशा जमिनीची माहिती आवश्यक असल्यामुळे पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण खात्याकडून हाती घेण्यात आले होते. सर्व्हेक्षण करताना एकूण जमिनीचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पूर्वेकडील सह्याद्री विभाग आणि पश्चिमेकडील किनारी विभाग. या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन असल्याचे अहवालात म्हटले आहे. या १३४८० पडीक जमिनीपैकी येत्या काही वर्षात तीन चार हजार हेक्टर मीटर जमीन तरी लागवडीखाली आणण्याचे लक्ष्य खात्याने निश्चित करावे अशी सूचना मंत्री सरदेसाई यांनी केली. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टीसाठी सरकारकडून सहकार्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. जनावरे शेतींची नाशधूस करीत असल्यामुळे त्यांना  उपद्रवी प्राणी ठरविण्याचा प्रस्ताव आहे का असे विचारले असा त्यांनी हा केवळ एका कृषीखात्याच्या अखत्यारीतील विषय नाही. त्यामुळे यावर व्यापक बैठक घेवून विचार केला जाईल. विशेषत: गव्या रेड्यांकडून शेतभातीची होत असलेली प्रचंढ हानी हा चिंतेचा विषय आहे. गव्याना उपद्रवी ठरविण्याच्या बाबतीत चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. यंदा जनावरांनी शेतीची नासाडी केल्यामुळे नुकसान भरपाईसाठी  ४ हजाराहून अधिक शेतक-यांनी अर्ज केले अस ल्याची माहिती कृषी संचालक नेल्सन फिग्रेडो यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा