शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पुरस्कृत उर्वरित तेराही उमेदवार निवडून येणार, कृषी मंत्री रवी नाईक

By आप्पा बुवा | Updated: May 3, 2023 19:46 IST

"नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम करून दाखवल्याने त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना होणार आहे."

फोंडा - आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, पाच तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आमचे उर्वरित तेरा नगरसेवकसुद्धा निवडून येतील. असा विश्वास कृषी मंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी  बोलताना ते पुढे म्हणाले की 'केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास आम्हाला निधीची कमतरता भासणार नाही. परिणामी विकास कामे राबवताना सकारात्मक वातावरण मिळेल. नागरिकांचा व मतदारांचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम करून दाखवल्याने त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना होणार आहे.

नगरपालिकेतील लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहे  त्यांचा आम्ही योग्य तो अभ्यास केलेला आहे. स्वच्छ व सुंदर शहराची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे .या संदर्भात जो विकासात्मक आराखडा तयार झाला आहे तो पुढील नगरपालिका मंडळाकडून पूर्ण करून घेण्यात येईल. फोंडा शहरातील आजूबाजूचा परिसर हा डोंगराळ असल्याने विकास कामे राबवताना कमी जमीन उपलब्ध होते याचे भान ठेवूनच विकास कामे राबवण्यात येतील. जे काही अपुरे प्रकल्प आहेत ते आगामी काळात पूर्णत्वास आणण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.भूमिगत वीज वाहिन्या  मलनिस्सारण प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. तिसऱ्या जिल्ह्याचे जे आपण स्वप्न पाहत आहे ते सुद्धा पाठपुरावा करून पूर्णत्वास आणण्यात येईल. चौकट नव्या इमारतींचे समर्थन:- रवी नाईक यांच्या म्हणण्यानुसार नगरपालिका मंडळाला जर अतिरिक्त महसूल प्राप्त करायचा असेल तर शहरात नव्या इमारती उभ्या रहायला हव्यात. इमारती तयार झाल्या तरच महसूल वाढेल. थोडक्यात त्यांनी शहरातील नवीन इमारतींचे समर्थन केले आहे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण