शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक मूर्ती तोडफोड प्रकरण:18 जानेवारीला निवाड्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:35 IST

धार्मिक मूर्तीची तोडफोड करून गोव्यात दहशत माजविणा-या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या तडीपारसंबधी अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली.

मडगाव: धार्मिक मूर्तीची तोडफोड करून गोव्यात दहशत माजविणा-या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या तडीपारसंबधी अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी तारीक थॉमस यांच्यापुढे हे प्रकरण आज सुनावणीस आले. संशयितातर्फे युक्तिवाद करताना वकील ऐरिक कुतिन्हो यांनी आपला अशील तुरुंगात असताना दक्षिण गोव्यातील मडकई भागात क्रॉस मोडतोडच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर उत्तर गोव्यातही धार्मिक स्थळांची मोडतोड झाली होते असे सांगितले. बॉय कोठडीत असताना राज्यात घडलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड बाबत त्यांचे वकील कुतिन्हो हे आता माहिती हक्क कायदयांर्तगत माहिती मागणार आहे. पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी ठेवण्यात आली असून, त्या दिवशी ते आपल्याकडील माहिती सादर करणार आहेत. त्याच दिवशी बॉयच्या तडीपार संबधी निवाडा होण्याची शक्यता आहे.बॉय याच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाचे सदयस्थिती काय आहे हे कळवावे असे सरकारपक्षाला यापुर्वी सूचविले तसेच संशयिताच्या वकीलाला बॉय किती प्रकरणातून निदरेष सुटला आहे व त्याच्यावर सदया किती खटले प्रलंबीत आहे व त्या खटल्याची सदयस्थिती कळवावी असेही सूचित केले होते.बॉय याच्यावतीने वकील ऐरिक कुतिन्हो यांनी मागील खेपेला बाजू मांडतांना आपल्या अशिलावर एकूण 19 गुन्हे नोंद झाले होते, त्यातील 12 प्रकरणात त्याची सुटका झाली आहे तर सात खटले सदया प्रलंबीत आहेत असे सांगितले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील व्ही.जे. कॉस्ता हे बाजू मांडीत आहेत.बॉय याने तडीपार प्रक्रियेच्या सुनावणीच्या वेळी हजर रहावे असा समन्स जिल्हा प्रशासनाने बजाविला होता.दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी बॉय याला दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यासंबधीची शिफारस केली होती. त्यासंबधी मागाहून बॉयला कारणो दाखवा नोटीसही बजाविण्यात आली होती. या नोटीसीला बॉयने आव्हान दिले होते. बॉयमुळे गावात दहशत निर्माण झाली असून, तुरुगांतून सुटल्यानंतर त्याने राजकारण्यावरही आरोप केले होते. या पाश्र्र्वभूमीवर पोलिसांनी त्याच्या तडीपारची शिफारस केली होती.14 जुलै 2017 रोजी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर सुमारे 150 धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यातील काही प्रकरणात तो न्यायालयात निदरेषही सुटला आहे. कुडचडे येथील बॉय हा टॅक्सीची भाडी मारत होता. रात्रीच्यावेळी तो धार्मिक स्थळांची मोडतोड करीत असे असा पोलिसांचा आरोप होता. गोव्यात मागच्यावर्षी धार्मिक स्थळांची विशेषता क्रॉस मोडतोडीची अनेक प्रकरणो घडली होती. पोलिसांनी खास चौकशी पथक तपासासाठी तयार केले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर बॉयला अटक केली होती.