शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वीज ग्राहकांना दिलासा, 50 टक्के शुल्क माफ; उद्या मंत्रिमंडळाची  बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:31 IST

वाढत्या वीज बिलांविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्षाने चळवळच सुरू केली होती. वीज ग्राहकांचे संघटन करून अलिकडे काँग्रेसने मोर्चेही काढले.

ठळक मुद्देवीज बिलांमध्ये जे कायमस्वरुपी शूल्क असते, त्यात 50 टक्के माफ केली आहे. हाय टेन्शन ग्राहकांसाठीही वेगळी सवलत दिली गेली आहे.

पणजी : राज्यातील लोकांना मोठी वीज बिले येत असल्याने असंतोष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. घरगुती, व्यवसायिक व सर्व प्रकारच्या लो टेन्शन ग्राहकांसाठी एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीकरिता वीज बिलातील 50 टक्के कायमस्वरुपी शुल्क सरकारने माफ केले आहे. एकूण 18.3 कोटी रुपयांची सवलत अशा प्रकारे वीज बिलात देण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

वाढत्या वीज बिलांविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्षाने चळवळच सुरू केली होती. वीज ग्राहकांचे संघटन करून अलिकडे काँग्रेसने मोर्चेही काढले. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी जास्त एसी वापरली, जास्त वीज वापरली व त्यामुळे वीज बिल वाढले असा अजब दावा वीज मंत्री निलेश काब्राल करत होते. मात्र लोकांमधील असंतोष वाढत चालला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची दखल घेतली व सर्व वीज ग्राहकांना सवलत जाहीर केली आहे.  लोकांनी एप्रिल व मे महिन्याची बिले अगोदरच भरली आहेत. त्यामुळे त्यांना यापुढे जी वीज बिले येतील, त्यात ही नवी सवलत लागू झालेली असेल.

वीज बिलांमध्ये जे कायमस्वरुपी शूल्क असते, त्यात 50 टक्के माफ केली आहे. हाय टेन्शन ग्राहकांसाठीही वेगळी सवलत दिली गेली आहे. एप्रिल व मे महिन्यात कमाल डिमांड शूल्क व प्रत्यक्ष नोंद झालेले कमाल डिमांड शूल्क यामधील फरक एप्रिल व मे महिन्याच्या (2020) बिलांसाठी माफ केला गेला आहे. काँग्रेसने सोशल मिडियावरूनही वाढीव वीज दरांविरुद्ध जोरदार मोहीम मंगळवारीच सुरू केली होती.

मंत्रिमंडळाची  बैठक मंत्रिमंडळाची  बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होणार आहे. वीज विषयक स्थितीवर त्यात चर्चा होऊ शकते. गोमेकॉ इस्पितळात प्लाझ्मा बँक स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ मंजुरी देईल. सनबर्न म्युझिक महोत्सव आयोजित करणाऱ्या परसेप्ट लाईव्ह कंपनीने सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे. मुख्यमंत्री कोविड-19 रिलिफ निधीसाठी पैसे उभे करण्याच्या हेतूने ऑनलाईन इवेन्ट आयोजित करण्यासाठी सरकारसोबत भागिदारी करण्यास आपण् तयार आहोत असे या कंपनीने कळवले आहे. त्याविषयीही मंत्रिमंडळ बैठकीत विचारविनिमय व निर्णय होणार आहे. राजभवनच्या सेवेसाठी कंत्रट पद्धतीवर एका वर्षासाठी दोघा वाहन चालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळासमोर  येणार आहे.

टॅग्स :goaगोवा