शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी सवलती जाहीर, धोरण मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:47 IST

पणजी : गोव्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी सरकारने धोरण तयार केले असून, मंत्रिमंडळाने बुधवारी या धोरणाला मंजुरी दिली. सौरऊर्जा निर्मिती लोकांना करता यावी म्हणून सरकारने अनुदान, व्याजमुक्त कर्ज आदी विविध सवलती धोरणाद्वारे जाहीर केल्या आहेत.

पणजी : गोव्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी सरकारने धोरण तयार केले असून, मंत्रिमंडळाने बुधवारी या धोरणाला मंजुरी दिली. सौरऊर्जा निर्मिती लोकांना करता यावी म्हणून सरकारने अनुदान, व्याजमुक्त कर्ज आदी विविध सवलती धोरणाद्वारे जाहीर केल्या आहेत.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ज्यांच्याकडून सौरऊर्जा निर्मिती केली जाईल, त्यांना ग्रोस मीटरिंग पद्धतीने सरकार मोबदला देईल.सौरऊर्जा निर्मिती जे जास्त प्रमाणात करतील त्यांना वीज खात्यालाच नव्हे तर अन्य कुणालाही विजेची विक्री करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा राज्य हरित होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. राज्यात आठ ते नऊ महिने चांगला सूर्यप्रकाश असतो. जर कुणी खासगी जागेत किंवा कोमुनिदादीच्या जागेत किंवा सरकारी जागा वगळता अन्यत्र सौरऊर्जा निर्मिती करत असेल तर त्यासाठी भू-रुपांतरण करून घेण्याची गरज नाही. तसेच ग्रामपंचायत किंवा पालिका किंवा नगर नियोजन खात्याचा दाखला घेण्याचीही गरज नाही. धोरणात तशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. यापुढे कायदा दुरुस्तीही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सौरऊर्जा प्रकल्पासाठी 50 टक्के व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. एखाद्या गृहनिर्माण वसाहतीत एकच कंत्राटदार नेमून त्या वसाहतीतील सगळे लोक मिळून एकच ठिकाणी सौरऊर्जेची निर्मिती करू शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्टँडअलोन सौरऊर्जा प्रकल्पासाठी प्रकल्पावरील खर्चाच्या तुलनेत सरकार 30 टक्के अनुदान देईल. सरकारी जागेत सौरऊर्जा निर्मितीसाठी स्वतंत्र धोरण तयार केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.50 मेगावॉट वीज मंजूर केंद्र सरकारने गोव्याला 2022 पर्यंत दीडशे मेगावॉट सौरऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य ठरवून दिले आहे. गोवा राज्य प्रथम पन्नास मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य समोर ठेवत आहे, असे वीज मंत्री मडकईकर यांनी सांगितले. गोव्याची रोजची वीजेची गरज 577 मेगावॉट एवढी आहे. कधीकधी ही मागणी 60 मेगावॉटपर्यंत पोहोचते. गोव्याला एनटीपीसीने आता आणखी 50 मेगावॉट वीज मंजूर केली आहे. केंद्र सरकारकडे आम्ही 80 मेगावॉट विजेची मागणी केली होती. पन्नास मेगावॉट मिळाल्यामुळे आता वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा होईल, असे मंत्री मडकईकर म्हणाले.गोवा सरकारच्या वीज खात्याने भारतीय सौरऊर्जा महामंडळाशी पंचवीस वर्षे 25 मेगावॉट सौरऊर्जा खरेदीचा करार केला आहे. याशिवाय एनटीपीसीशी 6 मेगावॉट सौरऊर्जा खरेदीसाठी करार करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवा