शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजी, फळे, माशांची नियमित तपासणी करणार, सरकारची विधानसभेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:45 IST

बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली.

पणजी : बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली. तसेच गेले अनेक दिवस माशांची तपासणी करून पाहिली गेली, पण कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन सापडले नाही, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी ठराव मांडला होता. रसायनांचा वापर करून फळे, भाज्या, मासे, मांस, मसाले दूषित केले जात असल्याने चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची नियुक्ती केली जावी, अशी मागणी फालेरो यांनी ठरावाद्वारे केली होती. सरकारने अशा आयोगाची गरज नाही, असे फालेरो यांना सांगितले. सरकारकडे अन्न सुरक्षा आयुक्त आहेत. माशांच्या आयातीवरील बंदीचा आदेशही आयुक्तांनीच जारी केला, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नमूद केले.सरकारचे अन्न व औषध प्रशासन खाते नियमितपणे फळे, भाज्या, मासे यांचे नमुने घेऊन तपासणी करत आहे. एफडीएची प्रयोगशाळा ही अत्यंत चांगल्या दर्जाची आहे. 162 पेक्षा जास्त मासळीचे नमुने गेल्या अनेक दिवसांत तापसण्यात आले. फॉर्मेलिन आढळले नाही. फळे, भाज्या यांच्यावर रसायनांचा वापर केला जातो, अशा तक्रारी आल्यानंतर लगेच एफडीएचे अधिकारी जाऊन तपासणी करतात. यापुढेही तपासणी सुरूच राहील. एफडीएने एखाद्या ठिकाणी छापा टाकला म्हणून कुणीच आमदारांनी गडबडून जाऊ नये. एफडीएला स्वत:चे काम करू द्या. एफडीएवर विश्वास ठेवा, असे मंत्री राणे म्हणाले. एफडीएकडून आणखी 200 किट्स खरेदी केली जातील. एका किटचा वापर पंचवीस तपासण्यांवेळी करता येतो. गेल्या काही वर्षात अनेक विक्रेत्यांना एकूण चौदा-पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे राणो यांनी स्पष्ट केले.मासे विक्री घटली दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मासळी विक्री घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. अकारण कुणी भीती निर्माण करू नये. मासे, मांस, अंडी वगैरे सगळेच खाणो धोकादायक आहे असे चित्र कुणी निर्माण केले तर पर्यटनाला फार मोठा फटका बसेल. पर्यटन व्यवसायच नष्ट होईल. सध्या कळंगुट व अन्य किनारी भागातील हॉटेलांमध्ये चांगले गरवणीचे मासे आणून दिले तरी, कुणीच ते खात नाहीत. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे लोबो म्हणाले.

टॅग्स :goaगोवा