शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिदशेतच नेतृत्व गुण ओळखा!: मुख्यमंत्री; युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 11:03 IST

स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त गोवा विद्यापीठात विद्यार्थी संघटना, उच्च शिक्षण संचालनालय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने सोमवारी दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'यंग लीडर्स कॉन्क्लेव्ह' मध्ये मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आजच्या युवकांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आहे. या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा. जर विकसित भारत घडवायचा असेल तर युवकांनी राजकारणात येण्याची गरज आहे. आज भाजपमध्ये ५० टक्क्यांहून अधिक नेत्यांनी विद्यार्थिदशेत चळवळी केल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त गोवा विद्यापीठात विद्यार्थी संघटना, उच्च शिक्षण संचालनालय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने सोमवारी दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'यंग लीडर्स कॉन्क्लेव्ह' मध्ये मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. वीरेंद्र सोलंकी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष विनय राऊत व इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी विद्यार्थ्यांना राजकारणात जास्त संधी मिळत नव्हती. पण १९९४ नंतर अनेक युवक ज्यांनी त्या काळात नेतृत्व केले त्यांना राजकारणात संधी मिळाली. सध्या भाजपच्या ५० टक्के नेत्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकीय प्रवास सुरू केला आहे. आपण समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते असणे महत्त्वाचे आहे. अशी संधी काही लोकांनाच मिळत असते. त्या संधीचे आपण सोने केले पाहिजे.

गोवा विद्यापीठात २ लाख चौ. मी. जागेत फार्मसी, संगीत कला महाविद्यालयासाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्स उभारण्याचा विचार आहे. तसेच पुढील सहा महिन्यांत फार्मसी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली जाणार आहे. राज्यात नर्सिंगचे बहुतेक विद्यार्थी बीएससी करून नोकरी करतात. यामुळे एमएस्सी नर्सिंगधारकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी आता मुख्यमंत्री अॅप्रेंटीसशिप योजनेअंतर्गत एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा विचार करणार आहे. राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत सध्या नियोजन स्तरावर काम सुरू आहे. भविष्यात गोव्यातही मेट्रो रेल्वे येणार आहे. याबाबत प्रस्तावही तयार केला जात आहे. राजधानी पणजी आणि म्हापसा येथील बसस्थानक जुने झाले असून ते नवीन बांधण्याचा विचार आहे. यासाठी चर्चा सुरू केली आहे.

'एनजीओ'मुळे मुख्यमंत्री 

माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न हे माझ्या सामाजिक कामातून घडले. १९९६ साली महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी पाळी येथे माझे आयुर्वेदिक क्लिनिक सुरू केले. त्याच दरम्यान साई लाईफ केअर ही एनजीओ सुरू केली. या एनजीओमार्फत समाजकार्य करत गेलो. २००८ साली पर्रीकरांनी राजकारणात येण्याची संधी दिली. त्यावेळी मी हरलो पण माघार घेतली नाही. त्यानंतर आमदार, सभापती व मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. युवकांनी फक्त नोकरीमागे न लागता एनजीओ सुरु करा, सरकार सर्व मदत करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.

स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांना प्रेरणा देणारे आहेत. त्या काळत युवकांना देशाची समाजाची चिंता होती. तर आताच्या युवकांना स्वतःची काळजी असते. विवेकानंदांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही. देशहिताचे काम केले म्हणून त्यांचे विचार हे जगभर पोहचले आहेत. - डॉ. विरेंद्र सोलंकी, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत