शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मासळीच्या आयातीवर बंदीचा फेरविचार करा - मायकल लोबो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:55 IST

सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

म्हापसा - सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. तशी मागणी लोबो यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली असल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

राज्यात  फॉर्मेलिन असलेल्या मासळीची आयात होवू नये यासाठी आरोग्य मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून अशा प्रकारच्या मासळीतून लोकांच्या आरोग्याची असलेली चिंता त्यांना दिसून येत असल्याचे म्हणाले, मात्र आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे लोकांवर तसेच व्यवसायिकांवर त्याचे विपरीत परिणाम होणार असल्याचे लोबो म्हणाले. पत्रातून केलेल्या मागणी बरोबर त्यांच्याशी आपण स्वत: फोनवर चर्चा केली असून त्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली. 

मासळीच्या आयातीवर बंदी लागू करण्यापेक्षा गोव्यातील शेजारील राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून येणाºया मासळीवर बंदी उठवावी. या भागातून मासळीची आयात करणारे वाहने फक्त दोन तासाच्या अंतरात गोव्यात दाखल होवू शकतात. त्यामुळे मासळीची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनाची गरज नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशातून येणाºया मासळीवर मात्र बंदी हवी असेही ते ठामपणे म्हणाले. बंदी लागू करण्यापेक्षा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतिने ठोस उपाय योजना हाती घेणे मासळीची तपासणी करणे गरजेचे आहे. त्या करीता यंत्रणेचा वापर करुन उत्तरेत एक तर दक्षिणेत एका वाहनाचा वापर करुन मासळीची तपासणी करावी. त्यात फॉर्मेलिनची मासळी आढळून आल्यास त्यांना कठोर शासन करावे गरज पडल्यास पोलीस कारवाई सुद्धा करण्यात यावी अशीही मागणी लोबो यांनी केली. तसेच वेळ पडल्यास कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी पावले उचलण्याची सुचनाही लोबो यांनी केली. 

गोव्यात येणा-या पर्यटकाची किमान ८० टक्के पर्यटक मासळीचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगली मासळी खाण्यासाठी हवी असते. आयातीवर बंदी लागू केली असल्याने किनारी भागातील हॉटेल्स तसेच शॅक व्यवसायिकांवर त्याचे प्रचंड परिणाम होत असल्याचे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार असल्याचे सांगितले. गोव्यात मिळणारी मासळी लहान असल्याने लोकांना व्यवसायिकांना चालत नसल्याची माहिती दिली. 

मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे पापलेट, इसवण, सुरमई तसेच इतर मोठ्या प्रकारची मासळी दुर्मीळ होत चालली आहेत. गोव्यातील समुद्रात अशा प्रकारची मासळी मिळणे कठीण असल्याने त्यांची आयात करण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या मिळत असलेली मासळी गोवेकरांना विकत घेणे परवडण्यासारखी नसल्याची माहिती मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

टॅग्स :goaगोवा