शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना दहशतीखालीही गोव्यात रेव पार्टी; क्राईम ब्रँचने धडक कारवाई, 3 विदेशींसह 23 अटकेत, ड्रग्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 14:10 IST

वागातोर येथे रेव पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पणजीः देश कोरोनाच्या विळख्यात असतानाच रेवा पार्ट्या करण्याचे आणि अंमली पदार्थ सेवन धिंगाणा घालण्याचे प्रकार गोव्यात उघडकीस आले आहेत. गोवा क्राईम ब्रँचने वागातोर येथील एका फिरंगी विलास नामक  बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री  सुरू असलेल्या रेव पार्टीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केला आणि 23 जणांना अटक केली.

वागातोर येथे रेव पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे क्राईम ब्रँचने या ठिकाणी गुप्तपणे पाळत ठेवली होती. 15 ऑगस्टरोजी मध्यरात्री पोलिसांनी अचानाक येवून छापा टाकल्यामुळे सर्व पार्टीवाले अचंबित झाले. काहींनी पळही काढला तर 23 जणांना पकडण्यास पोलिसांना यश आले. 

अटक करण्यात आलेल्यात बहुतेक सर्व गोव्याबाहेरील आहेत तसेच गोव्यातीलही आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन विदेशी महिलांचाही त्यात समावेश आहे. त्या ठिकाणी 9 लाख रुपयांचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती या विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली. त्यात एक्स्टेसी हा घातक अंमली पदार्थ, एमडीएमएच्या गोळ्या आणि चरस होता. हे सर्व पदार्थ सेवन करण्यासाठी आणले होते अशी माहितीही पोलिसांकडून मिळआली आहे. 

क्राईम  ब्रँचचे निरीक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर, महिला उपनिरीक्षक रिमा नाईक आणि संध्या गुप्ता यांचा पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सर्व संशयितांवर सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा तसेच अंमली पदार्थांच्या वापराचा गुन्हा नोंदविला आहे.  

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस