पणजी : अकराही पालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड येत्या गुरुवारी ५ रोजी केली जाणार आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद मिळविण्यासाठी बहुतेक पालिकांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण ते ठरविण्यासाठी काही ठिकाणी मंत्री-आमदार आपल्या समर्थक नगरसेवकांची बैठक घेऊ लागले आहेत. मात्र, नगराध्यक्ष निवडण्याच्या वादावर तोडगा काढताना काही आमदारांचीही दमछाक होऊ लागली आहे. डिचोलीच्या नगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांची निवड होणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी अजित बिर्जे हे दावेदार आहेत. अन्यही काहीजण उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. पेडणेच्या नगराध्यक्षपदी स्मिता कुडतरकर किंवा श्वेता कांबळी यांची निवड होऊ शकते. उपनगराध्यक्षपदासाठी उपेंद्र देशप्रभू यांचे नाव जवळजवळ निश्चित आहे. कुडतरकर यांना नगराध्यक्षपद देण्याचे तत्त्वत: ठरले असल्याची माहिती मिळाली. वाळपईच्या नगराध्यक्षपदी दीड वर्षासाठी रामदास शिरोडकर यांची निवड करावी, असा निर्णय शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वाळपईच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. उपनगराध्यक्षपदी शेहजीन शेख यांची निवड करण्याचे ठरले आहे. पालिकेचा कार्यकाळ संपायला एक वर्ष शिल्लक असताना अख्तर शहा यांची नगराध्यक्षपदी निवड करावी, असेही नगरसेवकांनी ठरविले आहे. म्हापशाच्या नगराध्यक्षपदी कुणाची निवड करावी, याचा विचार सध्या उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी चालविला आहे. म्हापशात नगराध्यक्षपदासाठी संदीप फळारी, सुधीर कांदोळकर, मर्लिन डिसोझा, रोहन कवळेकर, रायन ब्रागांझा आदी पाच नगरसेवक शर्यतीत आहेत. पाचहीजण भाजपचे आहेत. मडगावच्या नगराध्यक्षपदी बबिता आंगले प्रभूदेसाई, तर उपनगराध्यक्षपदी डोरीस टेक्सेरा यांची निवड निश्चित झाली आहे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या गटाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली व त्या वेळी बबिता आंगले प्रभूदेसाई यांचे नाव गटाच्या नेत्या म्हणून निश्चित करण्यात आले. वास्कोत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. त्यावर मंत्री मिलिंद नाईक व आमदार कार्लुस आल्मेदा हे अजून तोडगा काढू शकलेले नाहीत. केपेच्या नगराध्यक्षपदासाठी फिलू डिसोझा यांचे नाव आघाडीवर आहे. कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षपदी लविता म्हास्कारेन्हस यांची निवड माजी आमदार ज्योकिम आलेमाव यांनी जाहीर केली आहे. उपनगराध्यक्षपदी मारियो मोराईस यांची निवड होणे अपेक्षित आहे. केपे, कुडचडे व काणकोणच्या नगराध्यक्षपदी कुणाची निवड (पान २ वर)
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By admin | Updated: October 31, 2015 02:16 IST