शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राणी पद्मावतीचे नृत्य इतिहासाशी विसंगत, गोव्यातही चित्रपटाला विरोध करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:08 IST

जयलीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यास कोणी आक्षेप घेतला नाही तर आमचाही त्यास विरोध असणार नाही.

पणजी - संजयलीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यास कोणी आक्षेप घेतला नाही तर आमचाही त्यास विरोध असणार नाही, असे स्पष्टीकरण येथील राष्ट्रप्रेमी संघटनांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, या चित्रपटात राणी पद्मावतीचे नृत्य हे आक्षेपार्ह असून ते इतिहासाशी सुसंगत नाही, त्यामुळे तेही वगळावे अशी मागणी या संघटनांनी केली.

हिंदू जनजागृती समिती व राजस्थानच्या नागरिकांची राष्ट्रप्रेमी संघटनांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी के. के. चतुव्रेदी, गजेंद्रसिंग राजपूत, मनोहर सिंग गौड, राजकमलसिंग राजपूत, बाबूलाल सोनी, नारायण सिग राजपूत, जयेश थळी यांची उपस्थिती होती. गजेंद्रसिंग राजपूत म्हणाले की, संजय लिला भन्साळी हे इतिहासाची तोडफोड करून चित्रपट निर्माण करतात, हा त्यांचा इतिहास आहे. पद्मावती चित्रपटात चित्तोडची राणी पद्मावतीच्या जोहर (सती जाण्याची प्रता) जाण्यामागील कथा आपल्या चित्रपटात आणली असली तरी, पद्मावती ही नर्तकी नव्हती. तरीही भन्साळी यांनी तिचे नृत्य चित्रपटात दाखविले आहे. 

जर अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नातही ती नृत्य करताना आली असेल, तर ते काल्पनिक नृत्य दाखविले गेले असावे असा प्रश्न उपस्थितांना केला तेव्हा भन्साळी यांनी इतिहासच पुढे मांडावा, त्यास काल्पनिकतेची जोड देऊ नये. राजस्थानमध्ये पद्मावती ही महिलांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना तेथील करणी सेनेने त्यास विरोध केला आहे. खरा इतिहास मांडण्यास आमचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा चित्रपट कोणी पाहिला आहे का? असा सवाल केल्यावर अद्याप चित्रपट पाहिला नाही, पण त्याच्या ट्रेलरवरून ते स्पष्ट दिसते, असे चतुव्रेदी म्हणाले. 

दत्ता नाईक म्हणाले की, भन्साळी हे आधुनिक काळातील जयचंद आहेत. पु. भा. भावे यांनी पद्मावती राणीवर नाटक काढले, त्यात इतिहासाची अजिबात तोडफोड केलेली नाही. उलट पद्मावतीच्या पात्रला उच्च स्थान दिले आहे. चित्रपटवाले मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे इतिहासाचा गैरवापर करतात. त्यांना देशातील जनतेच्या भावनांची अजिबात कदर नाही. भन्साळी यांचा आम्ही निषेध करीत असून, त्यांच्या या चित्रपटाला विरोध आमचा कायम विरोध राहील. थळी म्हणाले की, भन्साळी यांनी हा चित्रपट प्रथम राष्ट्रप्रेमी संघटनांना दाखवावा. त्यांना या चित्रपटात काही आक्षेपार्ह वाटले, तर त्यांना तो भाग वगळावा.