शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 14:02 IST

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध

मडगाव : चीनने भारतावर केलेला हल्ला हा पुर्वनियोजीत होता असे वक्तव्य करुन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यानी केंद्रातील मोदी सरकार व रक्षा मंत्रालय एवढे दिवस झोपा काढत होते हे मान्य केले आहे. या आक्रमणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

भाजपला देशाच्या सुरक्षेचे काहिच पडलेले नसुन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तीगत प्रसिद्धीचे चोचले पुरवीण्यासाठी भाजप सरकार केवळ स्टंटबाजी करण्यात धन्यता मानत आहे हे आता उघड झाले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे. 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासुन केवळ मोदींची व्यक्तिपूजा करण्यात सर्वच्या सर्व केंद्रीय मंत्री व भाजपचे पदाधिकारी गुंतले असुन, विदेश नीतीचे  कोणतेही ठोस धोरण आज भाजप सरकारकडे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

"लाल आंख" दाखवण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर आज नेपाळ सारखा छोटा देश डोळे वटारत आहे ही धक्कादायक बाब आहे. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या बरोबर गुजरातेत झोपाळ्यावर बसुन झुलणे व  महाबलीपूरम येथे त्यांच्या बरोबर दाक्षिण्यात वेशभूषा करुन स्वताचे फोटो काढुन प्रसिद्धी मिळवीणे या व्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

 

चीनने हल्ल्याची पुर्वतयारी केली होती तर त्याची माहिती भारताला कशी मिळाली नाही हे श्रीपाद नाईक यांनी सांगावे. आज सॅटलायट यंत्रणेने जगाच्या पाठीवर कोठे  काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती मिळू शकते. सरकारला याची जाणीव झाली नाही याचा सरळ अर्थ सरकार मोदींच्या दुसऱ्या पर्वातील वर्षपुर्तीचे सोहळे आयोजित करण्यात व्यग्र होती हे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले.

भाजपचे बेगडी देशप्रेम व निवडणुकीसाठी सैन्याचा वापर या जुमल्यांना आता जनता पुर्णपणे ओळखली असुन, भारतीयांच्या देशप्रेमाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी फायदा करुन घेण्याचा भाजपचा कुटील डाव आता जनतेला कळुन चुकला आहे. 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे शोभेचे बाहुले म्हणुन मोदी मंत्रीमंडळात असुन, आज त्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत. आयुर्वेदीक औषधाने इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्लस कोविड आजारातुन बरे झाल्याचा दावा करुन तोंडघशी पडलेल्या उत्तर गोव्याच्या खासदारानी चीन हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याने गोव्याला लाजेने मान खाली घालायला भाग पाडले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndian Armyभारतीय जवान