शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसेवेतील गुंतवणूक हाच पर्याय!

By admin | Updated: June 1, 2017 02:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे बुधवारी केला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास त्यासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. दोनापावल-पणजी येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये भारतीय रेल्वेसंबंधित आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी सुरुवातीला ज्या मार्गाने आर्थिक विकास साधला त्याची माहिती दिली. सर्व ठिकाणी एकाच बरोबर विकास साधणे अशक्य आहे, ही गोष्ट चीनने जाणून घेऊन देशभरातील काही शहरांचा विकास केला. त्यानंतर ती शहरे उत्कृष्ट दर्जाची रेल्वेसेवा देऊन जोडली गेली. अशा पद्धतीने टप्प्या-टप्प्याने संपूर्ण देश विकसित केला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आणि चीनमध्ये साम्य आहे. रेल्वे क्षेत्रात साधनसुविधांचा विकास हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवातही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती समजून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टींची आपण सादर केलेल्या दोन्ही रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामुळे अडीच वर्षांत रेल्वेत भरपूर सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेची १० टक्क्यांनी वाढ करण्याची क्षमता आहे; परंतु त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक आणि कार्यवाही पाहिजे, असे ते म्हणाले. चांगले परिणाम देण्यासाठी चांगली गुंतवणूक आवश्यक असते. रेल्वेच्या बाबतीत ती सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे सेवा ही जलद गतीची वाय-फाय नेटवर्क असलेली जगातील सर्वात जास्त लांबीची रेल्वे सेवा असल्याची माहिती खुद्द गुगलने दिल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेतही वाय-फाय देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंटरनॅशनल सेंटरतर्फे प्रभू यांचा सत्कार करण्यात आला.