शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 14:45 IST

राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

पणजी: राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी गोव्यात आलेले जावडेकर हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर व सुरक्षा व्यवस्थेवर राहुल गांधीनी संशय घेतला. राफेल कराराबद्दल अपप्रचार करून सरकारची आणि पर्यायाने देशाची बदनामी केली. या मुद्द्यावर त्यांना कधी चर्चा करायला नको होती, केवळ खोटे बोलून अपप्रचार करायचा इरादा होता. आजही ते संसदेत तेच करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर सत्य आता जनतेसमोर आले आहे.इतके दिवस लोकांची फसवणूक करण्याचा गुन्हा राहुल गांधी यांनी केला आहे. देशाची त्यांनी माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले.लोकांचा विश्वास आजही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे. कॉंग्रेसने कितीही खोटारडेपणा केला तरी त्यांचे इरादे फलदायी होणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला स्वीकारावा लागलेल्या पराभवाचा राफेल मुद्द्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर