शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

राहुल गांधी गोव्यातील खाण अवलंबित, सीआरझेड आणि कोळसा प्रदूषण पिडीतांशीही संवाद साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 19:41 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या ८ रोजी गोवा दौ-यावर येत असून सायंकाळी ६ वाजता त्यांचे आगमन होईल.

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या ८ रोजी गोवा दौ-यावर येत असून सायंकाळी ६ वाजता त्यांचे आगमन होईल. ताळगांव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित बूथ कार्यकर्ता संमेलनात ते संबोधतील तसेच या दौ-यात खाण अवलंबित, सीआरझेड तसेच कोळसा प्रदूषण पीडीतांशी चर्चा करतील आणि त्यांच्या भावना जाणून घेतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर राहुलजी प्रथमच गोव्यात बूथ संमेलनात संबोधणार आहेत. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या बूथ संमेलनात पक्षाचे गट सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी मिळून १२ हजारांची उपस्थिती असेल. ‘जीत की ओर’ अशी या संमेलनाची संकल्पना असून राज्यात लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापशातील विधानसभा पोटनिवडणुकाही काँग्रेस यावेळी जिंकेल, असा दावा केला. संमेलन यशस्वी करण्यासाठी गट स्तरावर बैठका घेण्यात आलेल्या आहेत. प्रदेश समितीची सदस्य, जिल्हा समित्यांवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, आमदार संमेलनास उपस्थित राहतील. चोडणकर म्हणाले की, राहुलजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश येईल. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. लोकसभेच्या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा पोटनिवडणुका होणार असलेल्या तिन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम नेटाने सुरु आहे. पक्षाचे प्रभारी चेल्लाकुमार यांनी म्हापशात बैठका घेतल्या आहेत, असे चोडणकर यानी सांगितले. ते म्हणाले की, खाणींचा विषय गेले वर्षभर हे सरकार सोडवू शकलेले नाही. खाण व्यवसाय बंद असल्याने लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. नवी सीआरझेड अधिसूचना पारंपरिक मच्छिमारांच्या मुळावर आली आहे तसेच किना-यांवरील अनेक बांधवांना त्याची झळ पोचलेली आहे. पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. कोळसा प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. या सर्व पीडीतांशी राहुलजी या भेटीत संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेस पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार, प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश मुख्य प्रवक्ता सुनील कवठणकर व डॉ. प्रमोद साळगांवकर उपस्थित होत्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीgoaगोवा